शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

स्वप्न तुमचे, बळ आमचे

By admin | Updated: June 28, 2016 02:40 IST

आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते.

वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंच्या मुलांना ‘लोकमत’ चे पाठबळ : शिष्यवृत्ती देऊन केले सन्मानितनागपूर : आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. म्हणून उठा, जागे व्हा, लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, हा गुरुमंत्र देत तुमच्या स्वप्नांना आम्ही बळ देऊ अशी ग्वाहीही उपस्थित मान्यवरांनी दिली. निमित्त होते, ‘लोकमत’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंच्या गुणवंत मुलांच्या सत्काराचे. यावेळी ७० टक्क्यांहून जास्त गुण घेणाऱ्या ३५ विद्यार्थ्यांना लोकमतच्यावतीने शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले.सोमवारी सायंकाळी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहा ग्रुप आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सचे संचालक प्रा. रजनिकांत बोंदरे, अग्रवाल स्टडी सेंटर प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश अग्रवाल, ब्राईट अकॅडमी फॉर आयएएस कोचिंग सेंटरचे संचालक मनीष कामतकर, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान व लोकमतचे सहायक संपादक गजानन जानभोर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. प्रास्ताविक गजानन जानभोर यांनी केले. संचालन वरिष्ठ वितरण विपणन व्यवस्थापक मुश्ताक शेख यांनी तर आभार मतीन खान यांनी मानले.(प्रतिनिधी)आम्ही तुमच्या सोबत, मान्यवरांची ग्वाही‘करिअर’ची निवड करताना आपल्याला त्यात किती आवड आहे, याला महत्त्व द्या. ते पूर्ण करण्यासाठी स्वत:सोबतच ‘कमिटमेंट’ करा, तेव्हाच समाधान आणि यश मिळेल, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्रा. रजनीकांत बोंदरे, जगदीश अग्रवाल व मनीष कामतकर यांनी येथे केले. सोबतच ज्या लोकमत वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंच्या गुणवंत मुलांना मार्गदर्शनाची, शिकवणी वर्गाची व पुस्तकांची गरज असेल त्यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या गुणवंतांना केले सन्मानितयश श्रीकांत वासनिक (९४), लोकेश जयप्रकाश देवांगण (९४), लक्ष्मी रवी ठवकर (९४.८०), नेहा भोजराज भोयर (९१.४०) मोहित सुरेश मस्के (९०.८०), अभिषेक भालचंद्र जोशी (८९), संकल्प गुणवंतराव चाके (८८.८०), साहिल अरविंद कळमकर (८८.२०), साक्षी अशोक वाटकर (८७), नूतन बाबुराव मंडाले (८७.६०), आयुशी प्रभाकर चौधरी (८६.४०), आशुतोष दीपक गाडे (८५.६९) (बारावीचा विद्यार्थी), वरुणकुमार रामसुशील मिश्रा (८४.६०), अपेक्षा विनोद रंगारी (८२.४०), भागेश विनोद पवनीकर (८२.२०), गुंजन प्रकाश नागदिवे (८२.२०), सारंग शैलेश शेंडे (८१), अंजली धनराज बनकर (८०.८०), अंकिता कृष्णाजी नागुलकर (८०.२०), प्रतीक्षा विनायक सयाम (८०), अभिषेक रामधर कुशवाह (७९.२०), भूषण प्रमोदराव मोरखडे (७८.६०), नलिनी मधुकर पवणीकर (७८), महिमा अनिल वराडे (७६.८०), प्रतीक्षा संजय सोमकुवर (७६.४०), सायली संजय भोंगाडे (७५.६०), श्रेया हिरालाल तांबे (७५), अमिषा जगदीश जांभुळकर (७३.४०), श्यामल अरुण मडावी (७२.६०), प्रणाली लक्ष्मण बागडे (९२), रितीका लवकुश झाडे (८६.४०), दिशांत शांताराम ढोक (८०.४०), आरफीन मेहबूब शहा बनवा (७५.६०), सागर मुकुंदा नागपुरे (८१.७०), प्रज्वल मेश्राम (७४).