शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कळमेश्वर रोडवरील हॉटेलमध्ये तरुणीची हत्या; प्रेमप्रकरणातून चाकूने वार, आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:28 IST

ही घटना गुरुवारी दुपारी अडीच ते साडे तीनच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर : कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाजवळील एका ओयो हॉटेलमध्ये तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच ते साडे तीनच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि मृत तरुणी दोघेही ओयो हॉटेलमध्ये चेक इन करून एका खोलीत गेले होते. काही वेळानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील रिसेप्शनिस्टने हस्तक्षेप करून दोघांना समजावले. यावेळी युवकाने पुढे कोणताही वाद होणार नाही, असे आश्वासन दिल्याने परिस्थिती तात्पुरती शांत झाली.

मात्र, काही वेळानंतर आरोपी युवकाने पुन्हा तरुणीशी वाद घालत तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आणि प्रचंड रक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. वारदात केल्यानंतर आरोपी युवकाने पहिल्या मजल्यावरून उडी मारत घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हॉटेल परिसराला घेराव घालून पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

प्राथमिक तपासात ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर नागपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Young woman murdered in OYO hotel; suspect absconding.

Web Summary : A young woman was brutally murdered in an OYO hotel near Nagpur. The suspect, after an argument, stabbed her and fled. Police are investigating a potential love affair motive and have launched a manhunt.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर