लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई ते नागपूर असा प्रवास करून उमरेड येथे आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी पेठ येथील रहिवासी असलेल्या या तरुणाचे वय 27 वर्षे असून तो मुंबई येथे बँकेत कर्तव्यावर होता. दिनांक 19 ला सदर तरुण मुंबई येथून नागपूर येथे आला. सोमवारी 22 जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. मंगळवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. सदर तरुण कुणाकुणाच्या संपर्कात आला याचा शोध घेतला जात आहे. उमरेड, भिवापूर आणि कुही या तीनही तालुक्यात अद्याप एकही कोरोना रुग्ण नव्हता. तरुणाच्या या पॉझिटिव्ह अहवालामुळे परिसरात खळबळ उडाली आहे
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे मुंबई येथून आलेला तरुण पॉझिटिव्ह निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 14:47 IST