शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वेगाने दुचाकी चालविल्यामुळे नागपुरात युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:22 IST

वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देशांतिनगरातील घटना : पाच आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. मृत शांतिनगर येथील रहिवासी ३० वर्षीय आशिष नामदेव देशपांडे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूरज मेश्राम, निखील मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम व आदर्श ढोके आहे.

नालंदा चौक परिसरातील वस्तीमध्ये अरुंद गल्ल्या आहे. येथूनच मृत आशिषचे येणेजाणे होते. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आशिषचा एका महिलेशी वाद झाला. महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर शांतिनगर पोलीस घटनास्थळी पोहचले, पण आशिष तेथून निघून गेला होता. पोलीस गेल्यानंतर पुन्हा रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो आला. पुन्हा त्याच महिलेशी वाद घालू लागला. त्या महिलेने वस्तीतील लोकांना फोन करून आशिष आल्याचे कळविले. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणारेही तिथे पोहचले. त्यांनी आशिषवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर रॉड आणि फर्शीने वार केला. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांच्या ताब्यातून तो पळू शकला नाही. आशिषचा वाद झाल्याची माहिती मिळताच त्याची पत्नी अर्पिता घटनास्थळी पोहचली. आरोपींकडून हल्ला होत असल्याचे बघून तिने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलीस येत असल्याचे बघून हल्लेखोर तेथून पळून गेले.अनेक वेळा झाले होते वादआशिष वेल्डिंगचे काम करीत होता. पोलीस सूत्रांच्या मते आशिष पूर्वी गुन्हेगारीत लिप्त होता. त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. आशिष नालंदानगर चौक परिसरातील वस्तीतून ये-जा करीत होता. वस्तीतील गल्ली अतिशय अरुंद असतानाही तो वेगाने दुचाकी चालवित होता. त्यामुळे अपघात होण्याची भीती होती. यापूर्वी आशिषसोबत बरेचदा वस्तीतील लोकांचा वाद झाला होता. तरीसुद्धा तो वेगाने दुचाकी चालवित होता.आरोपी खोटी माहिती देत आहेआशिषच्या कुटुंबीयांच्या मते आरोपी स्वत:ला वाचविण्यासाठी खोटी माहिती देत आहे. आशिषकडे अ‍ॅक्टीव्हा गाडी होती. गल्ली अरुंद असल्याने वेगाने गाडी चालविणे शक्यच नाही. नालंदानगर चौकात आशिषच्या मुली शिकवणीला जातात. मुलींना शिकवणीला पोहचवून देण्यासाठी तो गल्लीतून ये-जा करीत होता. आरोपींचा परिसरात दबदबा आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण दिले जात आहे. आशिषच्या कुटुंबीयाचे म्हणणे आहे की, त्याचा गुन्हेगारीशी कुठलाही संबंध नव्हता. आरोपींशी त्याचा थोडाफार वाद झाला होता. त्याच्या हत्येमध्ये अजूनही काही लोक सहभागी आहे.मुली झाल्या अनाथआशिषला दोन मुली आहे. तो एकटा मुलगा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई भंडाऱ्याला गावी गेली होती. घटनेपूर्वी तो पत्नीसोबत बाजार घेऊन आला होता. पत्नीने चहापत्ती संपली असल्याचे सांगितल्यामुळे तो घराबाहेर पडला होता. त्याच्या हत्येमुळे दोन्ही मुली अनाथ झाल्या आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून