शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच औषधोपचार न मिळाल्याने नागपुरात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 18:48 IST

तीव्र आर्थिक कोंडीमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका तरुणाची प्रकृती सारखी बिघडतच गेली आणि त्याचा करुण अंत झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीव्र आर्थिक कोंडीमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका तरुणाची प्रकृती सारखी बिघडतच गेली आणि त्याचा करुण अंत झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. साहिल सुनील मोहबे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एनआयटी क्वॉर्टरमध्ये राहणारा साहिल गेल्या १० वर्षांपासून मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होता. साहिलचे वडील वृद्ध असून, ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अर्जनवीस म्हणून काम करतात. त्यांची आर्थिक स्थिती फारच खराब आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, साहिलला वयाच्या बाराव्या वर्षापासून मधुमेहाने ग्रासले होते. तो सकाळ-संध्याकाळ इन्सुलिन घेत होता. काही दिवसापूर्वी त्याचे मूत्रपिंड खराब झाले. डॉक्टरांनी महागडे आणि तातडीचे औषधोपचार सांगितले. परंतु घरात खायची सोय नसल्याने सर्वच हवालदिल होते. त्यामुळे उपचारात हयगय झाली. १५ दिवसापूर्वी साहिलला लघवी येणे बंद झाले. घराजवळच्याडॉक्टरकडून जुजबी उपचार घेऊन साहिल आणि कुटुंबीय दिवस ढकलत होते. त्यामुळे प्रकृती बिघडत गेली. त्याला चार दिवसापासून ताप आला होता. मात्र घरीच त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची अवस्था लक्षात घेऊन शेजाऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र लॉकडाऊनमुळे तीव्र आर्थिक कोंडी असल्याने त्याच्या घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कपिलनगर पोलिसांना सोमवारी दुपारी एका व्यक्तीने फोन करून काही तरी संशयास्पद असल्याची माहिती दिली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वैद्यकीय पथक घेऊन साहिलचे घर गाठले. त्याला मेयोत नेण्यात आले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केले. तीव्र आर्थिक कोंडीमुळे आवश्यक उपचार वेळेवर न मिळाल्याने साहिलचा जीव गेल्याची माहिती परिसरात चर्चेला आली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी सोमवारी कपिलनगरचे एएसआय राजीव डोंगरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर