शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘योग’ योगसाधनेचा !

By admin | Updated: June 21, 2015 02:54 IST

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिवस’ म्हणून जाहीर केला आहे.

नागपूर : संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी सामूहिक योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका आणि जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यशवंत स्टेडियम येथे सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यशवंत स्टेडिमवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील तर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी मुख्य अतिथी राहतील. यासोबतच राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, खा. विजय दर्डा, खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, मनपा विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त एस.पी. यादव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे आदी उपस्थित होते. शाळांमध्येही होणार योग दिन साजरा रविवार सुटीचा दिवस असला तरी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी २१ जून रोजी सकाळी ७ ते ८ या वेळातच उपस्थित राहावे आणि ७.३५ पर्यंत तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रात्यक्षिके करून घ्यावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जारी केले आहेत. वारांगनाही करणार योग इंडियन रेड क्रॉस सोसायटीने गंगाजमुना येथील वारांगनांसाठी दुपारी १२ ते १ या वेळात योगसाधना शिबिर आयोजित केले आहे. यात वारांगनाही योगाची प्रात्यक्षिके करतील.