शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

योगा शेड्स की ओपन थिएटर्स, महत्त्व जास्त कशाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

- जनसेवकहो कलावंतांकडेही लक्ष पुरवा : मतपेटीच्या हव्यासापोटी उपक्रमशीलतेकडे कानाडोळा प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘आरोग्यम् ...

- जनसेवकहो कलावंतांकडेही लक्ष पुरवा : मतपेटीच्या हव्यासापोटी उपक्रमशीलतेकडे कानाडोळा

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘आरोग्यम् धनसंपदा’ असे म्हणत नागरिकांचा ओढा योगसाधनेकडे वाढतो आहे आणि मनपा, नासुप्र, नगरसेवक, आमदार, खासदार आदी जनसेवक वेगवेगळ्या आयामांद्वारे प्रोत्साहनही देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शहरात उद्यानांत, मैदानांत व सार्वजनिक उपयोगाच्या जागी शेकडोच्या संख्येने योगा शेड्स उभारण्यात आली आहेत. ही बाब चांगली असली तरी हे योगा शेड्स खरंच उपयोगी ठरत आहेत का, केवळ योगसाधकांसाठीच हा डोलारा उभा करण्यापेक्षा बहुविध उपयोगांची ओपन थिएटर्स का उभारू नये, असा सवाल उपस्थित व्हायला लागला आहे.

शहरात जवळपास प्रत्येकच वस्तीतील सार्वजनिक उपयोगाच्या मोकळ्या जागेत, उद्यानांमध्ये आणि पटांगणांमध्ये नागरिकांच्या आग्रहास्तव किंवा जनसेवकांच्या निवडणूकपूर्व आश्वासनांतून योगा शेड्सची उभारणी करण्यात आली आहे. साधारणत: २० बाय ३० च्या आकाराचे हे योगा शेड्स असतात आणि त्यांना येणारा निविदेनुसारचा खर्च १५ लाख रुपयांच्या आसपासचा असतो. मजबूत भरणा असलेला सिमेंटचा ओटा, वर बांबूचे अगर टिनचे शेड व बांबूचे अगर काँक्रीटचे सुरक्षा कवच, असे या योगा शेड्सचे स्वरूप असते. दिसायला सुरेख असल्याने ते आकर्षकच असते. त्यात सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास योगाभ्यासाचे वर्ग चालतात. उर्वरित वेळेत कोण्याच्या उपयोगाचे, हा प्रमुख प्रश्न आहे.

शहरात नाटक, नृत्य, संगीतात उत्तम कलावंत आहेत. नृत्य व संगीताचे विशेष क्लासेस चालत असल्याने त्यांना तेवढासा त्रास नाही. मात्र, नाट्यकलेचे होतात त्या तालमी. या तालमीतूनच अभिनेते, दिग्दर्शक, लेखक घडत असतात. मात्र, त्यांच्याकडे हक्काची अशी जागाच नाही. ओपन थिएटर्स उभारली गेली तर शहरात एक सांस्कृतिक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे आणि तेथे योगाभ्यासासोबतच अन्य उपक्रमही सुरू करता येतील. मात्र, जनसेवकांकडे कलावंतांसाठी वेळ आहे का, हा प्रश्न आहे.

कलावंतांच्या मागणीकडे कानाडोळा

दीड वर्षापूर्वी शहरातील रंगकर्मींनी तत्कालिन महापौर नंदा जिचकार यांच्याकडे योगा शेड्सऐवजी ओपन थिएटर्स उभारण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. शहरातील कलावंतांना हक्कांची थिएटर नाहीत, अशा स्थितीत योगा शेड्सऐवजी ओपन थिएटर्स उभारण्यात आले तर कलावंतांना आपल्या कला सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होतील आणि तेथे योगसाधनेसह कलाविषयक, प्रबोधनात्मक उपक्रम सुरू करता येतील, असा हेतू या मागणीमागे होता. या मागणीचे महापौरांनी कौतुकही केले होते. मात्र, त्यानंतर महिनाभरातच महापौरपदावरून त्यांची गच्छंती झाली आणि नंतर कोरोनाचा प्रकोप वाढल्याने ओपन थिएटर्सचा विषय बारगळला गेला. आता पुन्हा एकदा बऱ्याच ठिकाणी योगा शेड्स उभारण्यात यायला लागले आहेत.

योगा शेड्सवर खासगी मालकी

बहुतांश योगा भ्यास मंडळांनी या योगा शेड्सवर खासगी मालकीप्रमाणे अधिकार गाजविण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील कलावंतांनी तेथे काही उपक्रम सुरू करण्याचे योजल्यास ही मंडळे त्यांना परवानगी देत नाहीत. यामुळेही कलावंतांचा हिरमोड होत असल्याचे निदर्शनास येते शिवाय, ज्या ठिकाणी समाजभवन उभारण्यात आले आहेत तेथेही योगा शेड्सची गरज का, असाही प्रश्न उपस्थित होतो. समाजभवनाचे संचालन करणाऱ्यांसोबत योगोभ्यासी मंडळांची भांडणे असल्यानेही वेगळ्याने योगा शेड्स उभारण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे, सार्वजनिक मालमत्ता या वैयक्तिक हेवेदाव्याच्या गोष्टी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

..........