शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

योगशास्त्राचा स्वीकार साऱ्या जगाने केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 20:12 IST

योगशास्त्राच्या प्राचीन परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य महान असून, निरामय जीवनासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज योगशास्त्राचा स्वीकार साऱ्या  जगाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादननागपुरात अखिल भारतीय योग संमेलन

आॅनलाईन लोकमतनागपूर : योगशास्त्राच्या प्राचीन परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य महान असून, निरामय जीवनासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असून आज योगशास्त्राचा स्वीकार साऱ्या  जगाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.रामनगर संघ मैदान येथे जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार अजय संचेती, आमदार डॉ. परिणय फुके, ब्रह्मस्थानंदजी महाराज, मंडळाचे अध्यक्ष सुनील सिर्सीकर, कार्यवाह राम खांडवे, मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. योगमूर्ती या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनार्दनस्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योगशास्त्र व योगाभ्यास ही प्राचीन विद्या असून ती आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. योगशास्त्राला वैज्ञानिक अधिष्ठान लाभले असून, योगमहर्षी पतंजली यांनी योगशास्त्र सूत्रबद्ध केले व विकसित केले. योग ही जीवनपद्धती, संस्कार असून योगाभ्यासामुळे व्यक्तीला शारीरिक व आत्मिक समाधान लाभते. आंतरिक ऊर्जा प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला जगभरातून प्रतिसाद मिळाला व जगभर योगदिन साजरा करण्यात येतो. भिन्न संस्कृती व परंपरा असलेल्या देशातही योगशास्त्राचा अवलंब करण्यात येत आहे. योग ही शाश्वत व्यायाम व चिकित्सापद्धती असल्याचा स्वीकार प्रगत राष्ट्रांनीही केला आहे. योगशास्त्र जगभर पोहचविण्यात व हजारो योगशिक्षक घडविण्यात जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे मोठे योगदान आहे. जनार्दनस्वामी व योगाभ्यासी मंडळासारख्या संस्थांना योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नक्कीच पाठबळ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.अखिल भारतीय त्रिदिवसीय योग संमेलनात योगशास्त्रासंदर्भातील विविध व्याख्याने, चर्चासत्रे व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह राम खांडवे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Yogaयोग