यो यो हनीसिंगला ऑस्ट्रेलिया, दुबईला जाण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:51 PM2019-02-07T22:51:27+5:302019-02-07T22:52:48+5:30

सत्र न्यायालयाने गुरुवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला येत्या १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुबई आणि १ ते ३१ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, विमानाची तिकिटे, रहिवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक यासह दौऱ्याची संपूर्ण माहिती सदर पोलिसांना सादर करण्याचा आदेश दिला व दौऱ्यावरून परत आल्यानंतर न्यायालयात हजेरी लावण्यास सांगितले.

Yo Yo Honey Singh allowed to go to Australia, Dubai | यो यो हनीसिंगला ऑस्ट्रेलिया, दुबईला जाण्याची परवानगी

यो यो हनीसिंगला ऑस्ट्रेलिया, दुबईला जाण्याची परवानगी

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : अटींचे पालन करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला येत्या १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुबई आणि १ ते ३१ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, विमानाची तिकिटे, रहिवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक यासह दौऱ्याची संपूर्ण माहिती सदर पोलिसांना सादर करण्याचा आदेश दिला व दौऱ्यावरून परत आल्यानंतर न्यायालयात हजेरी लावण्यास सांगितले.
यासंदर्भात हनीसिंगने अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला. हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. यासंदर्भात व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी केलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. तसेच, विविध अटी निश्चित करून दिल्या आहेत. त्यामुळे त्याने हा अर्ज दाखल केला होता. यापूर्वी हनीसिंगला बँकॉक, दुबई, लंडन व हवाना येथे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे व अ‍ॅड. आशिष किल्लेदार तर, तक्रारकर्ते जब्बल यांच्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Yo Yo Honey Singh allowed to go to Australia, Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.