शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तिळावर संक्रात ; लाडू होणार महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:47 IST

यावर्षी मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तिळाचे पीक कमी असल्यामुळे तीळसंक्रांतीत लाडू महाग होणार आहे. ग्राहकांकडून मागणी नसतानाही एक महिन्यापूर्वी ९० रुपयांत मिळणारे तीळ आवक कमी असल्याच्या वृत्ताने १२५ रुपयांवर पोहोचले आहे.

ठळक मुद्देउत्पादन कमी, मागणी वाढली

आॅनलाईन लोकमतनागपूर : यावर्षी मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तिळाचे पीक कमी असल्यामुळे तीळसंक्रांतीत लाडू महाग होणार आहे. ग्राहकांकडून मागणी नसतानाही एक महिन्यापूर्वी ९० रुपयांत मिळणारे तीळ आवक कमी असल्याच्या वृत्ताने १२५ रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी पांढऱ्या  तिळाचे भाव ९० रुपयांवर स्थिर होते.गेल्या वर्षी तीळ उत्पादक राज्यांमध्ये विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे तीळसंक्रांतीत भाव ८० ते ९० रुपयांदरम्यान होते. आवक जास्त झाल्यामुळे भाव फारसे वाढले नाहीत. पण यावर्षी तीळ उत्पादक राज्यात पावसामुळे पीक खराब झाले आहे. याशिवाय सर्वाधिक तीळ उत्पादन राज्य गुजरातमधून आवक फारच कमी आहे. तसेच विदेशातही उत्पादन कमी झाल्यामुळे भारतातून मागणी वाढली आहे. निर्यातीसाठी निविदा काढण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे निर्यातीत वाढ होणार आहे. तसेच भाववाढ होण्याच्या शक्यतेने मोठे विक्रेते आतापासूनच साठा करीत आहेत. त्याचाही परिणाम भाववाढीवर होत आहे.पूर्वीच्या तुलनेत आता तीळ स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. चवीसाठी भाज्यांमध्ये थोडं तीळ टाकण्याची प्रथा वाढली आहे. त्यामुळे पांढरे आणि लाल तिळाची वर्षभर विक्री होते. लाल तिळात प्रथिने आणि तेलाचे प्रमाण जास्त असते. खाण्यास पौष्टिक असल्यामुळे विदर्भात संक्रांतीला लाल तिळाला जास्त मागणी असते. सध्या पांढरे आणि लाल तिळाचे भाव सारखेच आहेत. संक्रांतीला दीड महिन्याचा अवधी असल्यामुळे भाववाढीची शक्यता जास्त असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर