शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

यावर्षीही मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला; बंगालच्या उपसागरातील बदल कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 18:35 IST

Nagpur News बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास २९ सप्टेंबरनंतरच सुरू हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे २९ नंतरच हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मान्सूनच्या अनियमिततेवरून हवामान बदलामुळे हाेणाऱ्या परिणामांचे संकेत सहज लक्षात येतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास लांबत चालला आहे व ताे यावर्षीही कायम आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास २९ सप्टेंबरनंतरच सुरू हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (This year too, the return journey of the monsoon was long; Causing changes in the Bay of Bengal)

साधारण १७ सप्टेंबरदरम्यान पावसाळ्याचा परतीचा काळ गृहित धरला जाताे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून यात बदल हाेत आहेत. हवामान विभाग दिल्लीचे के. एस. हाेसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीही परिस्थिती बदललेली आहे. वातावरणात एकापाठाेपाठ एक बदल घडून येत आहेत. सध्या मध्य प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळेच मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे आणि पाऊसही हाेत आहे. यामुळे विदर्भातही पावसाळी वातावरण आहे. यानंतर शनिवारी, रविवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, ते वायव्य दिशेला सरकत आहे. ही परिस्थिती विदर्भात पावसासाठी कारणीभूत ठरली आहे.

मान्सूनदरम्यान विदर्भ व महाराष्ट्रात एकतर अरबी समुद्रात बदल झाल्याने किंवा दुसरे बंगालच्या उपसागरात बदल झाल्याने पावसाळी वातावरण तयार हाेते. सध्या अरबी समुद्रातील वातावरण शांत आहे, पण बंगालच्या उपसागरात सातत्याने बदल घडत आहेत. यामुळे मध्य प्रदेश, रायपूर, विदर्भ, मराठवाडा या भागात पावसाचा जाेर कायम आहे. हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये चार आठवड्यांचे अनुमान नाेंदवले आहे. दि. १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. दि. २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशात चांगला पाऊस हाेईल. दि. १ ते ७ ऑक्टाेबरदरम्यान उत्तर-पश्चिम तसेच मध्य भारतात पावसाचे अनुमान आहे. यावरून राजस्थानकडून सुरू हाेणारा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्ह आहेत. दि. ८ ते १४ ऑक्टाेबरदरम्यान पावसाचा जाेर ओसरेल पण देशात सर्वत्र सामान्य पाऊस हाेण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

साेमवारी, मंगळवारी विदर्भात जाेरदार पाऊस

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. २०, २१ सप्टेंबरदरम्यान विदर्भ, मध्य प्रदेशात चांगला पाऊस हाेईल. साेमवारी पूर्व विदर्भ म्हणजे गाेंदिया, भंडारा, गडचिराेली भागात जाेरदार पाऊस हाेईल. त्यानंतर मंगळवारी नागपूरसह वर्धा, अमरावती, अकाेला या भागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :Rainपाऊस