शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

नागपूर ग्रामीण आरटीओचा यंदाचाही उन्हाळा गोदामातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:53 IST

शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘सोयी दाखवा बक्षीस मिळवा’, असेच चित्र आहे. दहा वर्षे होऊनही हे कार्यालय आजही धान्याच्या गोदामातच अडकून पडले आहे. परिणामी, कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांना भर उन्हात उभे रहावे लागते, तर कर्मचाऱ्यांना तापत्या टीनाच्या शेड खाली घाम पुसत अर्जदारांचे काम करावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

ठळक मुद्दे४ वर्षे होऊनही १४ कोटींचे बांधकाम अर्धवटच : सोयींअभावी अधिकाऱ्यांपासून ते वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘सोयी दाखवा बक्षीस मिळवा’, असेच चित्र आहे. दहा वर्षे होऊनही हे कार्यालय आजही धान्याच्या गोदामातच अडकून पडले आहे. परिणामी, कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांना भर उन्हात उभे रहावे लागते, तर कर्मचाऱ्यांना तापत्या टीनाच्या शेड खाली घाम पुसत अर्जदारांचे काम करावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयाच्या स्वत:च्या इमारतीचे बांधकामाला ४ वर्षे झाली. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु बांधकाम अर्धवटच असल्याने कार्यालयाला हा उन्हाळाही धान्याच्या गोदामात काढावा लागणार आहे.कामठी रोडवरील अन्न पुरवठा विभागाच्या गोदामात २००८ पासून नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालय अडकून पडले आहे. केवळ आठ हजार चौरस फुटाच्या जागेवर जिल्हासह नागपूर विभागाचा डोलारा हे कार्यालय सांभाळत आहे. परंतु येथे सोयीच्या नावाने चार भिंती आणि डोक्यावर टिनाचे छप्पर एवढेच आहे. येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विविध कामानिमित्त येणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कार्यालयात पाण्याची सोय नाही. प्रसाधनगृहाचा अभाव आहे. येथील कर्मचारी परिसरातील ओळखीच्या घरांतील प्रसाधन गृहाचा वापर करतात. महिला कर्मचाºयांची तारांबळ उडते तर येथे येणारे वाहनधारक मैदानाचा आश्रय घेतात. कार्यालयात पार्किंगची सोय नाही. अवैध पार्किंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे. स्वत:ची जागा नसल्याने कार्यालयाच्या चार भिंती सोडल्यास संपूर्ण परिसरात हातठेल्यांपासून ते ‘आॅनलाईन’ केंद्राचे अतिक्रमण आहे. अतिक्रमण एवढे की जिथे अर्जदारांची रांग लागते तिथेच दलालांचे टेबल लागतात. कार्यालयाच्या आत तर भयाण चित्र आहे. कोंबड्याच्या खुराड्यासारख्या जागेत टिनाच्या शेडखाली कार्यालयीन कामकाज चालते. या सारख्या अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या कार्यालयाला सुरुवातीपासून स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा होती. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रयत्नही सुरू होते. यामुळेच ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातच कार्यालयाला पाच एकरची जागा मिळाली.२०१० पासून स्वतंत्र इमारतीचा पाठपुरावा२०१० मध्ये या जागेवर इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. सुरुवातीला या प्रस्तावाची दखलच घेण्यात आली नाही. २०११ मध्ये शासनाने नव्या दराप्रमाणे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. तळमजल्यासह चार मजली इमारतीसाठी १६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही पाठविण्यात आले. २०१२च्या हिवाळी अधिवेशनात विभागाच्या सचिवांनी या कार्यालयाची पाहणी केली, परंतु परिवहन कार्यालयाने एवढा निधी शक्य नसल्याचे कारण पुढे करीत कमी निधीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. कार्यालयाने प्रस्तावित इमारतीतील एक मजला, एक लिफ्ट, अंतर्गत रस्ते कमी करीत ११ कोटी ९७ लाख किंमतीचे अंदाजपत्रक व नकाशे परिवहन कार्यालयाला पाठविले, परंतु मंजुरी मिळण्यास उशीर होत होता. लोकमत’ने या संदर्भातील वृत्त लावून धरले. अखेर प्रशासनाला जाग येऊन २०१४ मध्ये १४ कोटींच्या बांधकामाला सुरुवात झाली.बांधकामाला लागली चार वर्षेकामठी रोडवरील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या ३०३४.४७ चौ.मी. जागेवर ग्रामीण आरटीओ कार्यालयाचे बांधकाम होणार होते. तळमजल्यासह तीन मजल्यांचे बांधकाम होते. बांधकाम विभाग क्र. १ ने कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे या बांधकामाची जबाबदारी सोपविली. साधारण दोन वर्षात बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता होती, परंतु चार वर्षे होऊनही इमारत आरटीओकडे हस्तांतरित झालेली नाही. सूत्रानूसार, विद्युत व्यवस्थेचे काम अद्यापही अर्धवट आहे. पूर्ण व्हायला आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, यामुळे इमारत हस्तांतरणाला वेळ लागत असल्याची माहिती आहे.नव्या इमारतीचे लवकरच लोकार्पणनागपूर ग्रामीण आरटीओचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ विद्युत व्यवस्थेचे काम शिल्लक आहे. लवकरच नव्या इमारतीत आम्ही स्थानांतरित होऊ.श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर