शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:29 IST

नागपुरातील नामांकित गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन मित्रांच्या जीवलग मैत्रीची गोष्ट एका सांगितीक मैफिलीत परवा नागपूरकर श्रोत्यांनी अनुभवली. त्या सच्च्या दोस्तीला साऱ्यांनीच सलाम केला.

ठळक मुद्दे‘अ‍ॅन इव्हीनिंग वूईथ सागर अ‍ॅन्ड सारंग’ : दोस्तीला संगीतमय सलाम 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील नामांकित गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन मित्रांच्या जीवलग मैत्रीची गोष्ट एका सांगितीक मैफिलीत परवा नागपूरकर श्रोत्यांनी अनुभवली. त्या सच्च्या दोस्तीला साऱ्यांनीच सलाम केला.विदर्भाचा किशोर कुमार म्हणून ओळखला जाणारा सागर मधुमटके आणि आपल्या वैविध्यपूर्ण गळ्यानी नामांकित असलेला सारंग जोशी, हे दोघेही जीवलग मित्र. या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आणि हेवेदावे असताना त्यांच्यातील मैत्रीची विण अतिशय मजबूत आहे. त्या मैत्रीला सलाम करण्यासाठी प्रवीण कोलते आणि तुषार देशपांडे या दोन मित्रांनी के. डी. इव्हेंट्सच्या माध्यमातून ‘अ‍ॅन इव्हीनिंग वूईथ सागर अ‍ॅन्ड सारंग’ या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सायंटिफिक सभागृहात केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एमएसईडीसीएलच्या ग्राहक पंचायतच्या सल्लागार अ‍ॅड. गौरी चंद्रायण, महावितरणचे मुख्य अभियंता अभय हरणे आणि अ‍ॅड. वृशाली प्रधान उपस्थित होते.मैत्रीला साद घालीत तिची विण अधिक घट्ट करीत सागर आणि सारंगच्या गाण्यांची मैफिल सुरू झाली. आपल्या मित्रांचे कौतुक पाहण्यासाठी समीर पंडित, नंदू गोहाणे, विजय चिवंडे, सोनाली दीक्षित हे नामांकित कलावंतही श्रोत्यांमध्ये होते. या मैफिलीला अधिक रंगतदार करण्यासाठी सागर आणि सारंगच्या गोतावळ्यातील सर्व नामांकित कलावंत व्यासपीठावर होते. सिंथेसायझरवर राजा राठोड, गिटारवर गौरव टांकसाळे, रॉबिन विलियम, तालवाद्य विक्रम जोशी, आॅक्टोपॅडवर राजू ठाकूर, तबल्यावर प्रशांत नागमोते, ढोलकीवर पंकज यादव या कलावंतांसोबत ही मैफिल तब्बल तीन तास रंगली. ‘शिर्डीवाले साईबाबा...’ या गीताद्वारे साईबाबाला वंदन करून हा कारवाँ सुरू झाला. पुढे या दोघांनी खास मैत्रीचे भावबंध उलगडणारे ‘तेरे जैसा यार कहां..., जिंदगी मिल के बितायेंगे, हाल ये दिल गा के सुनायेंगे..., ये दोस्ती हम नही तोडेंगे..., यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी..., सलामत रहे दोस्ताना हमारा...’ अशी सदासर्वकाळ मैत्रीचा कोपरा हळवा करणारी गाणी सादर करून आपल्याच दोस्तीचा परिचय दिला.याशिवाय ‘बचना ऐ हसिनों लो मै आ गया..., माना हो तुम बेहद हसी..., बाबू समझो ईशारे..., डाकीया डाक लाया..., कभी बेकसी ने मारा..., एक चतुर नार..., यारा हो यारा..., मै हुं डॉन..., चांद मेरा दिल..., क्या मौसम है..., ओम शांती ओम..., यम्मा यम्मा...प्यार हमे किस मोड पे ले आया...’ अशी काही अवखळ, रोमांस, खट्याळ मूडमध्ये नेणारी बहारदार गाणी अतिशय समरसतेने सादर करून सागर आणि सारंग यांनी श्रोत्यांच्या मनाला दिलखुलास आनंद दिला. सभागृहात उपस्थित सर्व रसिकांनी या ‘यारों के यार’ असलेल्या गुणी गायकांच्या स्वरांचा मनमुराद आनंद लुटला. डॉ. मनोज साल्पेकर यांच्या बहारदार निवेदनाने मैफिलीत अधिकच रंगत भरली.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर