शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपुरात कुस्ती प्रशिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 15:34 IST

मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

ठळक मुद्देमालिशच्या बहाण्याने घरी नेऊन कुकृत्यसक्करदरा पोलिसांत गुन्हाआरोपी प्रशिक्षक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.अजय मलिक (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. तो ओमनगरातील नागमंदीराजवळ राहतो. सक्करद-यातील एका शाळेत विविध प्रकारच्या खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. पीडित विद्यार्थीनी दोन आठवड्यांपूर्वी या शिबीरात कुस्तीचे प्रशिण घेण्यासाठी सहभागी झाली होती. आरोपी अजय मलिक हा तेथे मुलींना कुस्तीचे धडे देत होता. त्याची आधीपासूनच पीडित मुलीवर नजर होती. त्यामुळे त्याने मुलीला कुस्ती शिकण्यासोबत शरिराची मालिश करता येणेही आवश्यक असल्याचे सांगितले होते. मालिश शिवाय शरिर दणकट होत नाही आणि शरिर दणकट असल्याशिवाय कुस्तीगीर टिकत नाही, असे तो विद्यार्थ्यांना सांगायचा. त्याने पीडित मुलीलाही मालिश करण्याचा आणि शिकून घेण्याचा हट्ट धरला होता. गुरुवारी सकाळी पीडित मुलीने प्रॅक्टीस केल्यानंतर ७ वाजता तिने नकार देऊनही तो तिला जबरदस्तीने आपल्या घरी मालिश करण्यासाठी घेऊन गेला. एका रुममध्ये नेल्यावर त्याने तिला थेट कपडे काढण्यास सांगितले. तिने नकार दिला. यावेळी त्याने तिला बाध्य केले आणि मालिश करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला.पीडित मुलीने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना हा गैरप्रकार सांगितला. पालकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सांदिपान पवार यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने लगेच गुन्हा दाखल करू घेत आरोपीला अटक केली.पतीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हाकोराडी पोलीस ठाण्यात महादुल्यात राहणा-या एका महिलेने (वय ३८) तिच्या पती (वय ४४) विरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार नोंदवली. आरोपी नेहमी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत अनैसर्गिक शारिरिक संबंध प्रस्थापित करतो. बुधवारी आणि गुरुवारीदेखिल त्याने असाच प्रयत्न केला. तो असह्य झाल्याने महिलेने आरोपीविरुद्ध कलम ३७७, ५११,५०६ गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थी