शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

घातक शस्त्रांचे घाव - सक्करदऱ्यात तिहेरी हत्याकांड

By admin | Updated: April 10, 2015 02:06 IST

पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

नागपूर : पान सेंटरच्या बाजूलाच अवघ्या २० फुटावर आरोपींनी संजय आणि केशववर घातक शस्त्रांचे घाव घालून त्यांना ठार मारले तर पळून जाणाऱ्या एकनाथला रवीच्या घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. नागरिकांनी आपापली दारे बंद करून घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना अवघ्या १०० मीटर अंतरावर उगले बंधूंच्या कुटुंबीयांना बराच वेळपर्यंत काहीही माहीत नव्हते. एकनाथचा भाचा पान सेंटरवर येत असताना त्याला संजय आणि केशवचे मृतदेह दिसले. त्यामुळे ओरडतच तो घरी गेला. वृद्ध आई आणि तिच्या तिन्ही सुना घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनाही कळविण्यात आले. माहिती कळताच सक्करदरा पोलीस पोहोचले. यावेळी एकनाथला धुगधुगी होती. त्याला एका वाहनात घालून मेडिकलला नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी एकनाथलाही मृत घोषित केले. परिसरच नव्हे, पोलिसही हादरलेया तिहेरी हत्याकांडाने सक्करदरा, बिडीपेठ परिसरातील नागरिकच नव्हे तर पोलीस दलही हादरले. अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्यापाठोपाठ पोलिसांचा मोठा ताफा आणि पोलीस आयुक्त के.के. पाठक तसेच सहआयुक्त अनुपकुमार सिंग हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीनंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे तिहेरी हत्याकांड गुन्हेगारांमधील उफाळलेल्या वादाचा परिणाम असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. गुन्हेगारांमधील वैमनस्यावरून हे हत्याकांड घडल्याचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. मात्र, हा टोळीयुद्धाचा प्रकार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)उगले परिवारात आक्रोशएकनाथ, संजय आणि केशव हे तिघेही भाऊ एकत्र राहात होते. एकनाथ सर्वात मोठा असला तरी सर्वात आधी लग्न संजयचे झाले होते. त्यामुळे त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकनाथला एक मुलगा आहे तर, केशवची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. तिला कोणत्याही दिवशी मूल होऊ शकते. त्यामुळे उगले परिवारात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी होती. मात्र, हे आक्रित घडले. तीनही भाऊ एकाच वेळी निर्घृणपणे मारले गेल्यामुळे तिघांच्या पत्नी तसेच वृद्ध आईचा आक्रोश पाहवला जात नव्हता. मुले मात्र अबोध असल्यामुळे ती हा आक्रोश गप्पपणे बघत होती. त्यांना या भयावह घटनेची कल्पनाच नव्हती. उगले परिवाराचा आक्रोश परिसराला हलवून सोडणारा होता.