शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

भटकलेल्या पाकिस्तानी महिलेला सोपविले संस्थेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:06 AM

सदाकी दरबार संस्था रायपूर येथे झुलेलाल भगवानच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाकिस्तानातील सिंधी बागडी समाजाच्या महिलेला रेल्वे सुरक्षा दलाने सुखरुप तिच्या सहकारी सेवकांपर्यंत पोहोचविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.

ठळक मुद्देआरपीएफची मदत : सोबतच्या सेवकांसोबत झाली चुकामूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदाकी दरबार संस्था रायपूर येथे झुलेलाल भगवानच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाकिस्तानातील सिंधी बागडी समाजाच्या महिलेला रेल्वे सुरक्षा दलाने सुखरुप तिच्या सहकारी सेवकांपर्यंत पोहोचविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.मीरा मिर्झा बागडी (५३) रा. मजरमला, लालकणा, पाकिस्तान ही महिला पाकिस्तानच्या सिंधी बागडी समाजाच्या ४० सेवकांसोबत सदाकी दरबार संस्था रायपूर येथे झुलेलाल भगवानच्या कार्यक्रमासाठी आली होती. रायपूरवरुन नागपुरात आल्यानंतर दुसरी रेल्वेगाडी पकडून त्यांना अमरावतीला जायचे होते. परंतु चुकामुकीत या महिलेसोबतचे सर्व सेवक निघून गेले. ती प्लॅटफार्म क्रमांक १ वर रडताना आरपीएफचे उपनिरीक्षक भुरासिंह बघेल, जवान संजय खंडारे यांना दिसली. त्यांनी या महिलेची विचारपूस केली असता तिला उर्दू आणि दुसरी भाषा येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या घटनेची सूचना वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना देण्यात आली. बाहेरुन उर्दू बोलणाऱ्या व्यक्तीला पाचारण केल्यानंतर या महिलेने आपबिती सांगितली. त्यानंतर पवन बत्रा (३४) रा. जरीपटका हे आरपीएफ ठाण्यात आले. त्यांनी या महिलेसोबत सिंधी भाषेत संवाद साधून संबंधित ग्रुपच्या कार्यालयात संपर्क केला. कागदपत्रांची पुष्टी केल्यानंतर या महिलेला पवन बत्रा यांच्या सुपूर्द करण्यात आले. आरपीएफने केलेल्या सहकार्याबद्दल संबंधित महिलेने आरपीएफचे आभार मानले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWomenमहिला