शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींना काँग्रेस प्रवेशाची ऑफर, त्यांनी दिलं 'हे' उत्तर; सांगितला 'तो' किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 15:01 IST

गडकरी म्हणाले, दिवस कितीही वाईट आले तरी काम करण्यावर भर हवा.

नागपूर : आपली विचारधारा पक्की भाजपची आहे. विद्यार्थी नेता असताना एकदा डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याशी चर्चा सुरू होती. तुम्हाला चांगले राजकीय भविष्य आहे व तुम्ही चांगले व्यक्ती आहात; परंतु तुम्ही चुकीच्या राजकीय पक्षात आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये या, असे ते मला म्हणाले. त्यावर ‘मी विहिरीत जीव देईल, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेस पक्षाची विचारधाराच आवडत नाही,’ असे उत्तर त्यांना दिल्याची आठवण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.

वायपीओस साऊथ एशियाच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी त्यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, आयुष्यात अनेक संघर्ष येतात व लढत राहायला हवे. मानवी संबंध ही व्यवसाय, समाजकार्य व राजकारणातील सर्वांत मोठी ताकद आहे. कधीही ‘युज ॲंड थ्रो’ असे काम करू नये. ज्याचा एकदा हात पकडला, त्याची साथ कितीही वाईट दिवस आले तरी, सोडायला नको.

आयुष्यात काम करत असताना आत्मविश्वास व सकारात्मकता असली पाहिजे, मात्र अहंकार नको. कुणीही परफेक्ट नसतो, ही बाबदेखील लक्षात घ्यायला हवी. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असलात तरी कधी वाईट परिस्थिती येते व चढउतार होतात, मात्र आपण आपले काम करत राहायला हवे. एखाद्या वेळी पराभव झाला तर तो मनुष्य संपत नाही; मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करणे सोडतो किंवा युद्धभूमीतून माघार घेतो, तेव्हाच तो हरतो. विश्वसनीयता, प्रामाणिकपणा व लोकांचे ‘गुडविल’ हेच सर्वांत मोठे भांडवल आहे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस