शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये दोन लाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:13 IST

यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून रेल्वे सुरक्षा दलाने २० किलो गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : बॅगला आढळले एक दिवसापूर्वीचे एअरपोर्टचे सिक्युरिटी स्टिकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून रेल्वे सुरक्षा दलाने २० किलो गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. एसी कोचने तस्करी करण्यात येत असलेल्या या गांजाच्या ट्रॉलीबॅगवर एका दिवसापूर्वी प्रवास केल्याचे एअर इंडियाचे सिक्युरिटी स्टिकर आढल्यामुळे हाय प्रोफाईल आरोपीकडून या गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी रेल्वेगाडी क्रमांक १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक ए-१, बर्थ ११, १२ च्या मध्ये दोन बेवारस बॅग ठेवलेल्या असल्याची माहिती या गाडीत बल्लारशा ते नागपूर स्कॉटिंग करणारे आरपीएफ जवान राजेंद्र सिंह, प्रकाश खैरमारे, कुलदीप जाटव, अभिषेक टेकचंद, यशवंती पूर्वमाला, गीता यादव यांनी आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. ही गाडी अटेंड करण्याची सूचना आरपीएफ नागपूर ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णानंद राय यांना देण्यात आली. सायंकाळी ५.१५ वाजता संपर्कक्रांती एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आल्यानंतर संबंधित कोचमधील प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. आरपीएफचे उपनिरीक्षक दिलीप कुमार, जगदीश सोनी, हेमराज वासनिक, बिक्रम यादव यांनी दोन्ही बॅग गाडीखाली उतरविल्या. बॅगची तपासणी केली असता त्यात स्टिकरने चिपकविलेली गांजाची सहा पाकिटे आढळली. बाजारभावानुसार या गांजाची किंमत दोन लाख रुपये आहे. बॅगला स्वामी विवेकानंद एअरपोर्ट रायपूरचे १८ फेब्रुवारीला प्रवास केलेले विमानाचे सिक्युरिटी स्टिकर आढळले. त्यामुळे ही गाजांची तस्करी हाय प्रोफाईल आरोपीकडून होत असावी, असा संशय रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरCrimeगुन्हा