शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५५० कोटींची जमीन नागपूर मनपा मेट्रोला हस्तांतरित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:45 IST

नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८ हजार ६८० कोटी आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात महापालिका व नासुप्रला प्रत्येकी पाच टक्के वाटा उचलावयाचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिका ५५० कोटींची जमीन मेट्रोला हस्तांतरित करणार आहे. यातील ६६ कोटींची जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६६ कोटींच्या जमिनीचे हस्तांतरण : अनेक भूखंड ३० वर्षांच्या लीजवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८ हजार ६८० कोटी आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात महापालिका व नासुप्रला प्रत्येकी पाच टक्के वाटा उचलावयाचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिका ५५० कोटींची जमीन मेट्रोला हस्तांतरित करणार आहे. यातील ६६ कोटींची जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे.मेट्रोला रक्कम देणे शक्य नसल्याने महापालिकेने मेट्रो कॉरिडोरमधील आपल्या मालिकीच्या जमिनी मेट्रोला देऊ केल्या. आतापर्यंत मेट्रो मार्ग, स्टेशन, पॉवर स्टेशनसाठी जमिनी हस्तांतरित केल्या आहेत. मेट्रोने त्या जमिनीची किंमत बाजार मूल्यानुसार ६६ कोटी रुपये आकारली आहे. महापालिकेला मेट्रो प्रकल्प उभारणीत रक्कम देणे शक्य नसल्याने महापालिका आणखी काही जमिनी मेट्रोला देणार आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने प्रकल्पाचा खर्च ११ हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. वाटा वाढणार असल्याने त्यावर उपाय म्हणून महापालिकेने ज्या भागातून मेट्रो जात आहे, त्या भागातील महापालिकेचे बाजार किंवा मोडकळीस आलेल्या शाळा आणि इतर कार्यालयाची जागा महामेट्रोला देण्याचे ठरवले आहे. काही जमिनी हस्तांतरित झाल्या आहेत, तर काही प्रस्तावित आहेत.महापालिका मेट्रोला ३० वर्षांकरिता भाडेपट्टीवर अनेक भूखंड देणार आहेत. ते विकसित करून मेट्रो त्यातून उत्पन्न घेईल. त्यात महापालिकेचा ५० टक्के वाटा राहील. खोवा मार्केट, संत्रा मार्केट ते कॉटन मार्केटची सुमारे ७० एकर जमीन दिली जाणार आहे. तेथे मेट्रो खोवा मार्केट,संत्रा मार्केट विकसित करेल. ही जागा सुमारे ४०० कोटीची आहे. याशिवाय नेताजी मार्केटची सुमारे तीन एकर जमीन मेट्रोला हस्तांतरित केली जाईल. येथेदेखील मार्केट विकसित केले जाईल. ही सुमारे ६० ते ७० कोटीची जमीन आहे. मेट्रोच्या ४८ किमीच्या पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण कॉरिडोरमध्ये सुमारे ८०० कोटीची जमीन मेट्रोला दिली जाणार आहे. मेट्रो रेल्वे, मेट्रो स्टेशन आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार केले जातील. तसेच लंडनस्ट्रिटदेखील मेट्रोला विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे.सहा एकर जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्समहापालिकेने आतापर्यंत मेट्रोला १०७०९.५६ चौरस मीटर जमीन हस्तांतरित केली आहे. या जमिनीची किंमत ६६.६३ कोटी रुपये आहे. स्थलांतरित झालेल्या अनेक भूखंडाचे बाजारभावानुसार मूल्यांकन व्हायचे आहे. महापालिकेने आतापर्यंत ६६ कोटीपेक्षा जास्त जमीन दिली आहे. नासुप्रनेदेखील अनेक भूखंड मेट्रोला हस्तांतरित केले आहे. अंबाझरी तलावासमोर सुमारे सहा एकर जागेवर मेट्रो शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारत आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMetroमेट्रो