शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील निकृष्ट डांबरीकरण प्रकरण : अमृता कन्स्ट्रक्शनसह अभियंत्याला शो कॉज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:54 IST

अयोध्यानगर येथील ३०० मीटर रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरण प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देकनिष्ठ अभियंता लामसुंगे व उपअभियंता हेडाऊ यांनाही खुलासा मागविला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्यानगर येथील ३०० मीटर रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरण प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच संबंधित रस्त्याचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासह पुन्हा त्याच कंत्राटदाराकडून डांबरीकरण करण्याचे आदेश गुरुवारी रात्री जारी केले. संबंधित प्रकरणी कंत्राटदार कंपनी अमृता कन्स्ट्रक्शन, हनुमाननगर झोनचे कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, उपअभियंता के.सी. हेडाऊ, कनिष्ठ अभियंता लामसुंगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.अयोध्यानगर येथे प्रतापसिंह चव्हाण यांच्या घरापासून ते तडस यांच्या घरापर्यंत ३०० मीटर रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम काही महिन्यापूर्वी करण्यात आले. संबंधित कामावर १२ लाख रुपये खर्च झाले आहेत. संबंधित कामात गुणवत्तेकडे अजिबात लक्ष दिले गेले नाही. आयुक्त मुंढे यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या प्रकरणी कंत्राटदार कंपनी व जबाबदार अभियंत्यास नोटीस जारी करीत खुलासा मागविला आहे.विशेष म्हणजे आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, संबंधित रस्त्याचे काम कंत्राटदार कंपनी अमृता कन्स्ट्रक्शनला पुन्हा करावे लागेल. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी थर्ट पार्टी मार्फत करावी. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच कारवाईची रुपरेषा निश्चित केली जाईल. आयुक्त मुंढे आल्यापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकरणात स्पष्टीकरण मागवण्यात आलेले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे