शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पत्नीच्या मनात संशयाचा कीडा, पतीवरच केला ॲसिड हल्ला

By योगेश पांडे | Updated: December 9, 2023 01:05 IST

नागपूर : पतीवर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीने त्याच्यावर थेट ॲसिड हल्ला केला व त्यात पती गंभीर जखमी झाला. हुडकेश्वर ...

नागपूर : पतीवर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीने त्याच्यावर थेट ॲसिड हल्ला केला व त्यात पती गंभीर जखमी झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.धीरज भीमराव जयपुरे (४४, विठ्ठलनगर) असे जखमी पतीचे नाव आहे. तो भाजीविक्रेता आहे. त्याचे काही वर्षांअगोदर लग्न झाले होते व पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला. त्याने तीन वर्षांअगोदर किरणसोबत (२७) दुसरे लग्न केले होते. किरणचेदेखील हे दुसरे लग्न आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतरच किरण धीरजवर संशय घेऊन लागली. लहानलहान गोष्टींवरून त्यांच्यात वाद सुरू झाले व दुरावा वाढत गेला. ११ महिन्यांअगोदर ती वर्धा येथे तिच्या माहेरी गेली. धीरजने खूप विनंती करूनदेखील ती परतली नाही. अखेर धीरजने तिला नोटीस पाठवली होती. त्यामुळे ती नाराज होती. तिने अखेर घरी परत येण्याची तयारी दाखवली व १ डिसेंबर रोजी ती परतली. गुरुवारी सकाळी धीरज भाजी विकण्यासाठी घरून निघाला.

रात्री साडेआठ वाजता तो परतला व थकला असल्याने त्याने तिला चहा करायला सांगितले. त्यावेळी तो पलंगावर झोपून आपला मोबाईल पाहत होता. किरणने त्याला पलंगाच्या दुसऱ्या कडेला झोपायला सांगितले. धीरजने तसे केल्यावर अनपेक्षितपणे तिने त्याच्यावर ॲसिड फेकले. धीरजने तिला हाताने थांबवले व त्याच्या चेहऱ्याऐवजी अंगावर ॲसिड पडले. त्यात तो भाजला. त्यानंतर परत किरणने त्याच्या दिशेने ॲसिड पडले. त्याच्या डोळ्यालादेखील यात जखम झाली. वेदनेने धीरज ओरडत असताना किरणने घरातून पळ काढला. त्याच अवस्थेत धीरजने अजनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेले. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती देण्यात आले. धीरजच्या तक्रारीवरून किरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस