शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालकांना आवडले नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:07 IST

जगभरातील व्यापाराशी निगडित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रादेशिक संचालक झुबेन जाल यांनी नागपूर आवडल्याची क बुली दिली. जाल यांच्या नेतृत्वात एक टीम नागपूरची प्राथमिक चाचपणी करण्यासाठी आली होती. या टीमचे नागपुरात येणे आणि संचालकाला नागपूर आवडणे हे व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून चांगला संकेत समजला जात आहे.

ठळक मुद्देव्यापार उद्योगाच्या दृष्टीने चांगले संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील व्यापाराशी निगडित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रादेशिक संचालक झुबेन जाल यांनी नागपूर आवडल्याची क बुली दिली. जाल यांच्या नेतृत्वात एक टीम नागपूरची प्राथमिक चाचपणी करण्यासाठी आली होती. या टीमचे नागपुरात येणे आणि संचालकाला नागपूर आवडणे हे व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून चांगला संकेत समजला जात आहे.उद्योग क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टीमने आज नागपूरचा आढावा घेतला. जगभरात वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ३०० हून अधिक केंद्र आहेत. त्यातील ३० सेंटर्स भारतात आहेत. त्यापैकी मुंबई आणि पुणे अशी दोन केंद्रे महाराष्ट्रात आहेत. वेगाने विस्तारणाºया नागपूर शहरात वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हावे, उद्योगास चालना मिळावी म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. या टीमने मार्केट एरिया, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो रेल्वे आदी ठिकाणी भेट देऊन शहराची पाहणी केली.पत्रकारांशी बोलताना जाल म्हणाले की, प्रथमदर्शनी मला नागपूर खूप आवडले आहे. वाहतुकीची होणारी कोंडी अथवा नसणारी पर्याप्त साधने इतकी एक अव्यवस्था आहे, मात्र मेट्रो रेल्वे ज्या पध्दतीने काम करीत आहे, ते बघून हा प्रकार देखील लवकरच दूर होईल असे निदर्शनास येत आहे.जगभरातील व्यापाऱ्याना एकमेकांशी जोडणे, उद्योग व्यापाराशी संबंधित विषयांवर चर्चा घडवून आणणे, प्रदर्शने भरविणे, उद्योग पूरक वातावरण निर्मिती करणे अशी कामे वर्ल्ड ट्रे़ड सेंटर तर्फे राबविली जातात. आम्ही कुठल्याही शहरात जातो, तेव्हा मार्केटचा परिसर बघतो. तो आम्हास व्यवस्थित वाटल्यास तिथे एक लायसन्सी नियुक्त करतो. त्याच्या माध्यमातून इमारत बांधतो आणि तेथील गाळे त्यांच्याच माध्यमातून व्यापाऱ्याना विकतो. नागपुरात देखील आम्ही असाच लायसन्सी शोधू. स्मार्ट सिटीतील शहरांकडे फोकससरकारने स्मार्ट सिटीच्या निमित्ताने काही शहरांचा सर्व्हे केला आहे. त्यातून जी शहरे विकासाच्या दृष्टीने सक्षम वाटली त्या शहरावर त्यांचा फोकस राहणार आहे. आम्ही देखील अशा शहरांवर आपले लक्ष केंद्रित करीत आहोत. तिथे उद्योगासाठी पूरक असे वातावरण तयार करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. सीताबर्डी परिसरात केंद्र बनण्याची अपेक्षामेट्रोच्या दोन लाईन ज्या भागात एकमेकांना क्रॉस होतात, त्या परिसरात आमचे सेंटर असावे अशी आमची अपेक्षा असते. सगळे काही अंतिम झाले की किमान अडीच ते तीन वर्षात सेंटरचे कार्य सुरू होते, असेही जाल म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत अतुल गोयल उपस्थित होते.सरकारने केलेले कायदे ग्राहक हिताचेनोटाबंदी, जीएसटी, महारेरा हे सगळे कायदे ग्राहकाचे अंतिम हीत डोळ्यासमोर ठेवून बनविण्यात आले आहेत. त्याचा चांगला परिणाम जाणवेल. रिअल इस्टेट मार्केटवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. नागपुरात आमची चाचपणी सुरू आहे, लवकरच आम्ही सगळ्या काही निर्णयांना अंतिम स्वरूप देऊ असेही जाल म्हणाले.

 

टॅग्स :World Bankवर्ल्ड बँकnagpurनागपूर