शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

जागतिक वाघ दिन; वाघांचे ‘बंदिस्त प्रजनन’ नैतिक की अनैतिक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:55 IST

Nagpur News जगभरात जंगलातील नैसर्गिक वाघांची संख्या ३९०० असताना कॅप्टिव्ह वाघांची संख्या ५००० च्या वर आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक ३९००, पण कॅप्टिव्ह वाघ ५००० च्या वरसंवर्धनाच्या नावे अंगतस्करी अधिक

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतात वाघांची संख्या वाढली; पण जागतिकस्तरावर ती नगण्यच आहे. म्हणूनच अस्तित्वाचे संकट असलेल्या प्रजातीत वाघाचाही समावेश हाेताे. प्राणी, पक्षी आदी काेणत्याही प्रजाती नामशेष हाेण्यापासून वाचविण्यासाठी ‘कॅप्टिव्ह ब्रिडिंग’ (बंदिस्त प्रजनन) ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार वाघांच्या संवर्धनासाठीही कॅप्टिव्ह ब्रिडिंग तंत्राचा उपयाेग केला गेला. आश्चर्य म्हणजे, जगभरात जंगलातील नैसर्गिक वाघांची संख्या ३९०० असताना कॅप्टिव्ह वाघांची संख्या ५००० च्या वर आहे.

गेल्या १०० वर्षांत पृथ्वीवरील वाघांची संख्या ९५ टक्के कमी झाली आहे. सुमात्रा बेटातील ‘बाली’ व ‘जावन’ या दाेन प्रजाती नामशेष झाल्या आहेत. आता केवळ ६ प्रजातीचे अस्तित्व राहिलेले आहे. गेल्या दशकभरात भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशात वाघांची संख्या दुपटीने वाढली, ही महत्त्वाची गाेष्ट आहे. मात्र इतर देशात संख्या अगदीच नगण्य असल्याने कॅप्टिव्ह ब्रिडिंगचे तंत्र वापरून संख्या वाढविली जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या प्रकाराच्या विराेधात आवाज उठविला जात आहे. नामशेष हाेणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनाच्या नावावर प्राणिसंग्रहालयात शाेभेसाठी व अंगतस्करीसाठी त्याचा वापर केला जात असल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांकडून हाेत आहे. अमेरिका व ‘झेक रिपब्लिक’सारख्या देशात या अनैसर्गिक प्रकाराला जाेरदार विराेध केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतात वाघाच्या कॅप्टिव्ह ब्रिडिंगचा विचार हाेत नसला तरी माळढाेक व गिधाड या प्रजातींबाबत संशाेधन केले जात आहे.

- अमेरिकेत ५००० च्या आसपास वाघाच्या कॅप्टिव्ह ब्रिड, ३५० प्राणिसंग्रहालयात.

- झेक रिपब्लिकमध्ये ३९० ची उत्पत्ती, ३९ प्राणिसंग्रहालयात

कॅप्टिव्ह ब्रिडिंग काय?

नैसर्गिक अधिवासात किंवा प्रयाेगशाळेत बंदिस्त पिंजऱ्यात प्रजनन घडवून प्राणी किंवा पक्ष्यांची उत्पत्ती करणे हाेय. १९६० च्या दशकात या पद्धतीने ‘अरेबियन ऑरिक्स’ या प्राण्याच्या उत्पत्तीद्वारे ही सुरुवात झाली. आता तर काेल्हे, चित्ते, बिबटे, सिंह व अनेक पक्ष्यांच्या प्रजातींची उत्पत्ती या पद्धतीने करण्यात आली आहे. नामशेष हाेणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी कॅप्टिव्ह ब्रिडिंग महत्त्वाची मानली जाते व अनेक प्रजातींचे संवर्धन करता येत आहे.

पर्यावरणवाद्यांचे आक्षेप

- जैवविविधतेसाठी धाेकादायक

- या वाघांना सर्कसमध्ये, प्राणिसंग्रहालयात शाेभेसाठी वापरणे, रिसर्चसाठी वापरून अत्याचार केले जातात.

- कॅप्टिव्ह ब्रिडिंगनंतर जन्माला येणारी प्रजाती नैसर्गिक प्रजातीपेक्षा कमजाेर व राेगीट असते.

- जनुकीयदृष्ट्या कमजाेर ब्रिड तयार झाल्याने पुन्हा नामशेष हाेण्याचा धाेका.

औषधांसाठी अंगाची तस्करी

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गाेपाल ठाेसर यांनी सांगितले, अनेक औषधांमध्ये वाघांच्या अंगांचा वापर केला जाताे. विशेषत: चीनसारख्या देशात अनेक देशी औषधांमध्ये इतर प्राण्यांसह वाघांच्या अंगाचा वापर केला जाताे. मात्र या प्रजाती नैसर्गिक नसल्याने मग नैसर्गिक जंगली वाघांची अवैध तस्करी केली जाते.

नैसर्गिक व अनैसर्गिकमध्ये फरक असताेच. नैसर्गिक प्रजाती अधिक क्षमतावान असतात. कॅप्टिव्ह ब्रिडचे वाघ नैसर्गिक अधिवासात टिकाव धरू शकत नाही. प्रजातीच्या संवर्धनाच्या नावावर केले जात असले तरी हे एकप्रकारे अत्याचार केल्यासारखे आहे. त्यापेक्षा वाघांच्या नैसर्गिक संवर्धनाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे. दुपटीने वाघ वाढविणाऱ्या भारताचे अनुकरण करावे.

- गाेपाल ठाेसर, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :Tigerवाघ