जागतिक व्याघ्र दिन विशेष; राज्यात आठ वर्षांत १२ नवी अभयारण्ये घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:55 PM2019-07-29T12:55:34+5:302019-07-29T12:55:56+5:30

महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

World Tiger Day Special; 12 new sanctuaries announced in eight years | जागतिक व्याघ्र दिन विशेष; राज्यात आठ वर्षांत १२ नवी अभयारण्ये घोषित

जागतिक व्याघ्र दिन विशेष; राज्यात आठ वर्षांत १२ नवी अभयारण्ये घोषित

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात वाघांची संख्या वाढण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ष २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या १९० ते २०० असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. त्यापूर्वी २०१० मध्ये ही संख्या १७० च्या जवळपास होती. परंतु महाराष्ट्रात यावर्षी फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि संरक्षित वन क्षेत्रात झालेल्या वन्यजीव गणनेत वाघांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अधिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
वाघांची संख्या वाढण्यामागे वन्यजीव रक्षक त्यासाठी चार मोठी कारणे असल्याचे सांगत आहेत. राज्यात मागील १८ वर्षांतील प्रयत्नानंतर आतापर्यंत टायगर रिझर्व्ह आणि अभयारण्य क्षेत्राच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या ३० पेक्षा अधिक गावांचे वन्यजीवांचे अधिवास असलेल्या क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले. जवळपास ५,२०० कुटुंबांना वनक्षेत्रातून बाहेर पुनर्वसन करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. यासोबतच वर्ष २०११ पासून आठ वर्षात १२ नवे अभयारण्य घोषित करून संरक्षित वनक्षेत्रांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात जंगल क्षेत्राला लागून तीन हजार हेक्टर अतिरिक्त जमिनीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा वाघांच्या प्रजननासाठी अधिवास वाढला आहे.सरकारनेही शिकारीच्या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन संवेदनशील वन क्षेत्रात चांगल्या वन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटक
मागील ४ ते ५ वर्षात महाराष्ट्रात वाघ आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यातील ५० पेक्षा अधिक शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून ते कारागृहात आहेत. वन्यजीव अवयवांच्या विक्रीत सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांवरही वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोने नजर ठेवली. त्यामुळे या घटनांवर अंकुश लावण्यात यश मिळाले.

शासनाने दाखविली गंभीरता
‘काही वर्षांपासून शासन वन्यजीव गुन्ह्यांबाबत गंभीर झाले आहे. आधी शिकार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सहज जमानत मिळत होती. त्यामुळे त्यांचे मनसुबे उंचावले होते. परंतु शासनाने त्यांची जमानत थांबविण्यासाठी गंभीर होऊन प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिकारीवर अंकुश लावण्यात यश मिळाले. यामुळे वाघांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’
-किशोर रिठे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

Web Title: World Tiger Day Special; 12 new sanctuaries announced in eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ