शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

जागतिक निद्रा दिन: पुरेशी झोप न झाल्यास ‘कॅन्सर’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:35 AM

एका पाहणीत, ‘कॉल सेंटर’मध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध निद्रा विशेषज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.

ठळक मुद्देनिद्रा विशेषज्ञ सुशांत मेश्राम यांची माहितीसलग सात-आठ तास झोप महत्त्वाची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपेचे दोन टप्पे आहेत. एक ‘रेम स्लीप’ व दुसरी ‘नॉन रेम स्लीप’. पहिल्या टप्प्यात पापण्यांची फडफड, स्वप्नं पडणे आदी घडते. दुसऱ्या टप्प्यात पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात. याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना केली जाते. विशेषत: कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात. ही खूप महत्त्वाची व खरी झोप आहे. ही झोप न झाल्यास कॅन्सर होण्याचा धोका असतो. एका पाहणीत, ‘कॉल सेंटर’मध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध निद्रा विशेषज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.१६ मार्च हा दिवस जागतिक निद्रा दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, झोप लागणे, झोप लागलेली अखंड टिकलेली असणे आणि झोपेतून जागे झाल्यावर ताजेतवाने वाटणे, हे निरामय स्थितीचे लक्षण आहे. या तिन्ही घटनांपैकी कोणत्याही एका, एकापेक्षा अधिक किंवा तिन्हींत आलेल्या अडचणीला निद्रानाश म्हणतात. जगात ३५ टक्के लोक ‘निद्रानाश’, १७ टक्के लोक ‘स्लिप अ‍ॅपनिया’ने (झोपेत श्वसनक्रिया बंद होणे) तर १० टक्के लोक हे ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ने (झोपेत पायाचे दुखणे) पीडित आहेत. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आता ‘व्हॉटस् अ‍ॅप व फेसबुकमुळे यात भर पडत आहे.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप महत्त्वाचीडॉ. मेश्राम म्हणाले, शरीरामध्ये जैविक घड्याळ असते. जे सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलत राहते. याच्याशी झोपेचा संबंध आहे. जसा जसा सूर्यप्रकाश कमी होऊ लागतो तसे शरीरात ‘मेलोटोनीन’ नावाचे हार्मोन्स स्रवू लागते आणि झोप येऊ लागते. मेंदूतील संप्रेरकांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि इतर महत्त्वाची कार्ये या जैविक घड्याळाशी, पर्यायाने झोपेशी संबंधित आहेत. त्यामुळे योग्य वेळी, योग्य प्रमाणात झोप येणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्य