शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक त्वचा आरोग्य दिन; गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 09:56 IST

गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा असणे महत्त्वाचे असून जाहिरातींना भुलू नका, असा सल्ला इंडियन असोसिएशन आॅफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड लेप्रोलॉजिस्टतर्फे (आयएडीव्हीएल) देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे स्टेरॉईडयुक्त क्रीममुळे वाढले त्वचाविकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण अनेकविध उपाय करीत असतो. त्यातल्यात्यात गोरे बनविण्याचा दावा करणारी भरपूर उत्पादने आज उपलब्ध आहेत, पण ती उत्पादने वापरणे योग्य आहेत का, त्यांच्या वापराने खरोखरच रंग गोरा होतो का, की त्याचे इतर काही दुष्परिणाम तर त्वचेवर होत नाहीत ना, अशा अनेक प्रश्नांना त्वचा तज्ज्ञांना सामोरे जावे लागते. गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा असणे महत्त्वाचे असून जाहिरातींना भुलू नका, असा सल्ला इंडियन असोसिएशन आॅफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड लेप्रोलॉजिस्टतर्फे (आयएडीव्हीएल) देण्यात आला आहे.सुंदर व निरोगी त्वचा म्हणजे गोरा रंग, असे समीकरण सध्या रूढ होत चालले आहे. यातच प्रतिष्ठित सिनेतारका जाहिरातींद्वारे कोणत्याही क्रीमचा प्रचार करतात तेव्हा या गैरसमजाला दुजोरा मिळत आहे. परिणामी, डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच स्टेरॉईडसारख्या क्रीमचा सर्रास वापर होत असल्याने दिवसेंदिवस त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असल्याचे ‘आयएडीव्हीएल’चे म्हणणे आहे.प्रीस्क्रिप्शनशिवाय विकल्या जाणाऱ्या औषधांची उलाढाल मोठी ‘आयएडीव्हीएल’चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. विक्रांत सावजी म्हणाले, प्रीस्क्रिप्शनशिवाय विकल्या जाणाऱ्या औषधांची उलाढाल ही कोट्यवधीच्या घरात आहे. नूतन कायद्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली गेली तरच हा अनैतिक, अप्रामाणिक आणि अनारोग्यपूर्ण व्यवसाय रोखला जाईल. मात्र तसे होण्याऐवजी फक्त स्टेरॉईड्सच नव्हे तर त्याच्याबरोबर इतर घातक द्रव्यांचे मिश्रण असलेली नवीन क्रीम्स बाजारात आली आहेत. ती घातक ठरत आहेत. डॉक्टरांनी लिहून दिले तरच या औषधांची विक्री केली गेली पाहिजे.

क्रिम्सचे दुष्परिणाम झाल्यानंतरच डॉक्टरांकडे धावत्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे म्हणाले, त्वचारोगतज्ज्ञाकडे येण्यापूर्वीच बहुतांश रुग्ण क्रिम्स आणि लोशन्सचा मारा आपल्या चेहऱ्यावर करतात. त्यामुळे त्वचेचे साधे विकारही उपचार करण्यासाठी कठीण बनतात. अशा क्रिम्सचे दुष्परिणाम झाल्यामुळे त्वचारोगतज्ज्ञांकडे धाव घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत चालली आहे. त्वचा पातळ होणे हा अशा क्रिम्सचा भयानक दुष्परिणाम आहे.

स्टेरॉईड्स असलेल्या क्रीम्समुळे भयावह आजार - डॉ. पिंपळे‘आयएडीव्हीएल’चे सदस्य डॉ. आशिष पिंपळे यांच्या मते, नवीन संशोधनानुसार काही स्टेरॉईड्स असलेल्या क्रीम्स गोरे बनविण्याबरोबरच भयावह आजारांना आमंत्रण देत आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांत गोरे होण्याच्या जाहिरातीपासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे. कारण, बाह्य उपयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड असलेल्या सर्व औषधांना सरकारने ‘एच’ या वर्गवारीत टाकले आहे आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ती मिळू नयेत, असा कायदाही करण्यात आला आहे; शिवाय त्यांची जाहिरातही केली जाऊ नये, असा नियम आहे. यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्य