शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पक्षाघात दिन; चाळिशीत वाढतोय पक्षाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 09:45 IST

वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण आता ४० ते ५० वयोगटांतील व्यक्तींमध्ये झपाट्याने वाढत आहे.

ठळक मुद्देमृत्यूचे चौथे मोठे कारणगोल्डन अवरमध्ये १०० मधून येतात दोन रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण आता ४० ते ५० वयोगटांतील व्यक्तींमध्ये झपाट्याने वाढत आहे. धक्कादायक म्हणजे, अलीकडे २५ ते ३५ वयोटांतील तरुणांमध्येही हा आजार दिसून येत आहे. उच्च रक्तदाब, अपुरी झोप व तणाव, मद्यपान व धूम्रपानाची सवय, आहाराच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, मधुमेह व व्यायामाच्या अभावामुळे पक्षाघात वाढीस लागला आहे. पक्षाघाताच्या झटक्यानंतरचे पुढील चार ते सहा तास महत्त्वाचे असतात. परंतु या ‘गोल्डन अवर’मध्ये १०० मधून केवळ दोन-तीन रुग्णच उपचारासाठी येत असल्याने हे अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण ठरत असल्याची माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. सतीश लाहोटी यांनी दिली.२९ आॅक्टोबर हा दिवस ‘जागतिक पक्षाघात दिन’ म्हणून पाळला जातो, त्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.डॉ. लाहोटी म्हणाले, शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसिस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असेही म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे पॅरालिसीस होतो. त्यामुळे शरीराच्या काही विशिष्ट अवयवांवर नियंत्रण ठेवता येत नाही. स्वत:च्या इच्छेप्रमाणे हात किंवा पाय हलवता येत नाही. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोर जातो.

पक्षाघाताची लक्षणे दिसताच उपचार घ्यातोंड वाकडे होणे, पायांमध्ये कमजोरी येणे, तोल जाणे, चालताना त्रास होणे, बोलण्यात फरक पडणे, अंधुक दिसणे ही पक्षाघाताची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे आवश्यक आहे. तत्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. वयाची ६५ वर्षे ओलांडलेल्यांना याचा सर्वाधिक धोका संभावतो. परंतु अलीकडे वयाच्या ४०मध्ये हा आजार वाढल्याने या वयाच्या प्रत्येक व्यक्तीने डॉक्टरांकडून तशी तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. आनुवंशिकता, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदय विकार, हृदयाचे अनियमित ठोके, हृदयविकाराचा सौम्य झटका किंवा हृदयाघात, मधुमेह, लठ्ठपणा, झोपेदरम्यान अनियमित श्वासोच्छवास, ३५ वर्षाखालील धूम्रपान करणाºया महिलांद्वारे गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन, कामाचा ताण व कामाचे अनियमित स्वरूप, स्पर्धात्मक वातावरण, पुरेशा झोपेचा अभाव, पॅकेटमधील खाद्य पदार्थांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पक्षाघात होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.पक्षाघाताला नियंत्रणात ठेवता येतेरक्तदाबावर नियंत्रण, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, धूम्रपान-मद्यपान टाळल्यास, नियमित व्यायाम केल्यास व ताण-तणावाला दूर ठेवल्यास पक्षाघाताला वेळीच नियंत्रणात ठेवता येते.-डॉ. सतीश लाहोटीइंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट

टॅग्स :Healthआरोग्य