शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

नागपुरात होतोय ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’, सलग तीन दिवस दरवळणार संत्रा, रंगारंग कार्यक्रम विविध स्पर्धा अन् पुरस्कारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:42 IST

नागपुरी संत्रा म्हणजे जगप्रसिद्ध गोष्ट. या शहराचे उपनाव पडले तेच मुळात आॅरेंज सिटी. परंतु मागच्या काही वर्षात ही ओळख जरा पुसट होत चालली होती. हे चित्र बदलून संत्रा उत्पादनाच्या बळावर वैदर्भीय कृषी व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी नागपुरी संत्र्याला जगाच्या कानाकोप-यात पोहोचविण्यासाठी १६, १७ व १८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे.

नागपूर : नागपुरी संत्रा म्हणजे जगप्रसिद्ध गोष्ट. या शहराचे उपनाव पडले तेच मुळात आॅरेंज सिटी. परंतु मागच्या काही वर्षात ही ओळख जरा पुसट होत चालली होती. हे चित्र बदलून संत्रा उत्पादनाच्या बळावर वैदर्भीय कृषी व्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी नागपुरी संत्र्याला जगाच्या कानाकोप-यात पोहोचविण्यासाठी १६, १७ व १८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाबाबत अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली असून विविध शहरातून लोक कुटुंबासह या महोत्सवात येण्याच्या तयारीला लागले आहेत. यूपीएल समूह हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने तो आयोजित केला आहे. हे लोकमतचे इनिशिएटिव्ह आहे. १६ डिसेंबर रोजी नागपुरातील सुरेश भट सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात संगीत, कला, नृत्याची मेजवानी असेल. पण याहून महत्त्वाचे म्हणजे संत्रा उत्पादक शेतकºयांना संत्रा लागवडीपासून ते संत्रा वाहतुकीपर्यंतच्या ‘आॅरेंज व्हॅल्यू चेन’ची माहिती विविध चर्चासत्र आयोजित करून दिली जाईल.टायगरसोेबतच आॅरेंज टुरिझमविदर्भात पर्यटक जसे वाघ बघायला येतात तसे यापुढे त्यांनी संत्र्याची चव चाखायला यावे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवादरम्यान संत्र्याच्या बागांमध्ये सहल आयोजित केली जाणार आहे. हा ख्रिसमसच्या सुट्यांचा काळ आहे. या सुट्यांमध्ये महाराष्ट्रभरातील लोकांना आपल्या कुटुंबासह महोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.मनोरंजनाची धमाल : या महोत्सवादरम्यान अवघ्या शहरात मनोरंजनाची धमालही अनुभवता येणार आहे. यामध्ये हिंदी-मराठी नाटकांसह विविध कलावंतांचे नृत्य, गायन व वादनाचा आनंद नागपूरकरांना लुटता येणार आहे. याक्रमात अनुप सोनी आणि स्मिता बन्सल या कलावंतांशी संवाद, रुपमती जॉली आणि लकी केनी यांचे सुफी गायन, इंडियन गॉट टॅलेंट-२०१६ चा विजेता सुलेमानचे सुरेल बासरी वादन, भारतातील नामवंत डीजेंचे सादरीकरण व प्रसिद्ध गायक बेनी दयाल याच्या सुरमयी आवजाच्या मेजवानीचा समावेश आहे.भरभरून संत्री खाणार : या महोत्सवाच्या निमित्ताने नागपुरी संत्र्यांची प्रत्यक्ष चव चाखता येणार आहे. तब्बल तीन दिवसांचा प्लॅन करून आम्ही नागपूरला येतोय. मुलांची उत्सुकता तर शिगेला पोहोचली आहे. आम्ही सगळे भरभरून संत्रे खाणार आहोत आणि बॅण्ड, डीजे, नाटक आणि अ‍ॅडवेंचरस गेम्सचा थरारही अनुभवणार आहोत. - ममता शिंदे, मुंबईआमची बॅग पॅक झालीय : ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ नागपुरात होत आहे हे कळल्यापासून आमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. रसाळ संत्र्याच्या बागा कशा असतात हे मुलांना दाखवायचे आहे. बॅगचे पॅकिंगही झाले आहे. ही सर्व धमाल अनुभवायला महोत्सवाच्या एक दिवसाआधीच आम्ही नागपुरात दाखल होतोय.- गुणवंत कुळकर्णी, पुणेया महोत्सवाची अधिक अपडेट माहितीFacebook.com/worldorangefestival, Twitter.com/ worldorangefest, instagram.com/worldorangefestival, www.worldorangefestival.com यावर मिळेल.

टॅग्स :nagpurनागपूर