शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल: नागपुरी संत्र्याने जिंकली पाहुण्यांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील तज्ज्ञ प्रतिनिधींनी शनिवारी प्रगत ...

ठळक मुद्देसंत्रा शेतीला प्रत्यक्ष भेट : विविध प्रकारची माहिती जाणून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील तज्ज्ञ प्रतिनिधींनी शनिवारी प्रगत शेतकरी अखिल जुनघरे यांच्या काटोल रोडवरील भव्य संत्रा शेतीला प्रत्यक्ष भेट दिली व नागपुरी संत्र्याची पीक पद्धती, वैशिष्ट्ये यासह विविध प्रकारची माहिती जाणून घेतली. त्यांनी नागपुरी संत्र्याची चवही चाखली. नागपुरी संत्र्याने आपल्या एकंदरीत विशेषतेने त्यांची मने जिंकली.तज्ज्ञ पाहुण्यांमध्ये ब्राझीलचे डॉ. टोझॅट्टी, व्हिएतनामचे डॉ. होआ, नेपाळचे डॉ. उमेश आचार्य, डॉ. शांता कारकी, दक्षिण कोरियाचे डॉ. के. साँग व अमेरिकेचे डॉ. एस. गोवडा यांचा तर, इतर प्रतिनिधींमध्ये ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे, अध्यक्ष पी. जी. जगदीश, उपाध्यक्ष हरमिंदरसिंग मान, सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूटचे सिनियर रिसर्च फेलो आशिष वरघणे व अमोल कोकणे आणि संत्रा उत्पादक ऋषिकेश सोनटक्के यांचा समावेश होता. संपूर्ण जगात केवळ विदर्भामध्ये संत्र्यांची एका वर्षात दोन पिके घेतली जातात. पहिले पीक हिवाळ्यात तर, दुसरे पीक उन्हाळ्यामध्ये निघते. हिवाळ्यात पिकणाऱ्या संत्र्याला १० पर्यंत तर, उन्हाळ्यात पिकणाऱ्या संत्र्याला १२ वर फोडी असतात. हा संत्रा गोड-आंबट चवीचा आहे. त्यामुळे तो लोकप्रिय आहे. संत्र्याचे एक झाड १५ वर्षांवर उत्पादन देते. झाडाला झुपक्याने संत्री लागतात. या संत्र्यांची लांब अंतरापर्यंत वाहतूक करता येते. संशोधनामुळे नागपुरी संत्र्याच्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत, अशी वैशिष्ट्ये तज्ज्ञ पाहुण्यांना सांगण्यात आली. अन्यत्र कुठल्याही संत्र्यांमध्ये ही वैशिष्ट्ये आढळून येत नसल्यामुळे पाहुणे प्रभावित झाले.विदर्भातील संत्र्याच्या झाडांना होणाऱ्या विविध आजारांची माहितीही पाहुण्यांना देऊन त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच, विदर्भातील संत्र्याच्या विकासाकरिता सूचना विचारण्यात आल्या. पाहुण्यांनी संत्रा झाडांची देखभाल, औषधांची फवारणी, सिंचन इत्यादीवर मोलाचे मार्गदर्शन केले.७० एकर जमिनीवर संत्रा शेतीजुनघरे यांची काटोल रोडवर २२३ एकर जमीन असून, सध्या त्यापैकी ७० एकर जमिनीवर संत्र्याची झाडे आहेत. आठ हजार जुनी व सात हजार नवीन अशी एकूण १५ हजार झाडे त्यांच्याकडे आहेत. तसेच, संत्र्याच्या नवीन कलमा लावण्यासाठी आणखी नवीन जमीन तयार करण्यात आली आहे.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर