शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमुळे नागपूर जागतिक पटलावर; ऋषि दर्डा यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:08 IST

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपूर जागतिक पटलावर येईल. येणाऱ्या वर्षांत देश विदेशातून येणारे पर्यटक नागपुरात होणाऱ्या या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ला घेऊन पर्यटनाची योजना आखतील. कलेमध्ये सर्वांना जवळ आणण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषि दर्डा यांनी येथे केले.

ठळक मुद्देचित्र प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपूर जागतिक पटलावर येईल. येणाऱ्या वर्षांत देश विदेशातून येणारे पर्यटक नागपुरात होणाऱ्या या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ला घेऊन पर्यटनाची योजना आखतील. कलेमध्ये सर्वांना जवळ आणण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषि दर्डा यांनी येथे केले.‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ‘लोकमत’ व ‘सर जे.जे.स्कूल आॅफ आर्ट मुंबई’च्यावतीने रविवारी ‘जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी’ येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला संचालनालयाचे माजी संचालक डॉ. हेमंत नागदिवे, प्रा. सुभाष बाभूळकर, प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विकास जोशी व प्रा. अब्दुल गफ्फार उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात २९ विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीतून अभिव्यक्ती साकारलेली आहे.ऋषि दर्डा म्हणाले, नागपुरात अनेक महोत्सव होतात. या महोत्सवात गीत, संगीत व नृत्यांचा समावेश केला जातो. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची योजना तयार करताना यात चित्रकलेचाही समावेश करण्यात आला. या मागील मुख्य उद्देश म्हणजे राज्यभरातील युवा चित्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा आहे. लोकमत समूह नेहमीच कलावंतांना त्यांची ओळख देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आला आहे. ‘श्लोक’च्या माध्यमातून याचे दायित्व पूर्ण केले जात आहे. राज्याच्या छोट्या-छोट्या भागातील प्रतिभावंत कलावंतांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. भविष्यातही हे दायित्व कायम राहील.सोहळ्यात औरंगाबाद येथील प्रसिद्ध चित्रकार नानासाहेब येवले व मुंबईचे राकेश सूर्यवंशी यांचा सत्कार ऋषि दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे प्रा. विकास जोशी यांनी केले. ते म्हणाले की, या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित चित्रकला कार्यशाळेत युवा चित्रकारांना कुठलाही विषयाचे बंधन ठेवले नाही. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी विषयाची निवड करण्याची सूट देण्यात आली होती. या प्रदर्शनाला शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे सहकार्य मिळाले.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर