लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सखींनो, घरातील स्वयंपाकगृहात तुम्ही आजपर्यंत असंख्य चवदार पदार्थ बनविले असतील. हे तुमचे कौशल्य जगाला दाखविण्याची नामी संधी लोकमततर्फे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्यानिमित्ताने चालून आली आहे. यावेळी तुम्हाला संत्र्यापासून पाककृती तयार करण्याचे कौशल्य दाखवायचे आहे.१८, १९, २० व २१ तारखेला वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल होऊ घातले आहे. जागतिक महोत्सव नागपुरात होत असताना येथील सखींच्या सहभागाशिवाय त्यात रंगत येईल ती कशी? म्हणूनच लोकमत सखी मंचच्यावतीने खास सखींसाठी वेगवेगळे उपक्रम ठेवले आहेत. जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचा कुकरी शो यानिमित्त होणार आहे. शुक्रवार १८ जानेवारी रोजी गिनीज बुकमध्ये जागतिक विक्रम नोंदविणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे ऑरेंज हलवा तयार करून याची धमाकेदार सुरुवात होणार आहे. रेशीमबाग मैदानावर दुपारी ३ वाजता विष्णू मनोहर हे ऑरेंज हलवा तयार करणार आहेत. यासोबत २० जानेवारी रोजी आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाईन्स येथे संजीव कपूर यांच्या कुकरी शोचे खास महिलांसाठी आयोजन केले आहे. यावेळी तुम्ही संत्र्यापासून तयार केलेल्या पाककृती सादर करून संजीव कपूर यांच्या कुकरी शोमध्ये जागा निश्चित करू शकता. ही पाककृती तयार करतानाचा व्हिडीओ सिद्धी यांच्या ९१६७३२९७५१ या क्रमांकावर पाठवा किंवा #वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल यावर अपलोड करा. तुम्ही पाठविलेल्या पाककृतीमधून १० पाककृतींची निवड संजीव कपूर करतील आणि त्या विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतील. विशेष म्हणजे, ऑरेंज रेसीपी कॉन्टेस्टमध्ये सहभागी होणाऱ्या सखींनाच संजीव कपूर यांचा कुकरी शो बघण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.याशिवाय अनेक धमाल मनोरंजक कार्यक्रम खास सखींसाठी आयोजित करण्यात आले आहेत. तर सखींनो, ही धमाल अनुभवण्यासाठी व करण्यासाठी आहात ना तुम्ही सज्ज? पाककृती करतानाचा एक व्हिडीओ पाठवा आणि या भव्य आयोजनाचा हिस्सा व्हा.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : सखींनो, संत्र्याच्या रेसीपीसाठी सज्ज व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 07:00 IST
सखींनो, घरातील स्वयंपाकगृहात तुम्ही आजपर्यंत असंख्य चवदार पदार्थ बनविले असतील. हे तुमचे कौशल्य जगाला दाखविण्याची नामी संधी लोकमततर्फे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्यानिमित्ताने चालून आली आहे.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : सखींनो, संत्र्याच्या रेसीपीसाठी सज्ज व्हा
ठळक मुद्देसखींसाठी खास मेजवानी