शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम सारा टोड यांनी शिकविले संत्र्याचे स्वादिष्ट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 20:01 IST

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ख्यातनाम व आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व पाककलेची आवड असणाऱ्या गृहिणींना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे याचे प्रात्याक्षिक करून दाखवले.

ठळक मुद्देआॅस्ट्रेलियन मास्टर शेफ : हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित

 ऑनलाईन लोकमत नागपूर : वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ख्यातनाम व आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व पाककलेची आवड असणाऱ्या गृहिणींना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. हा कार्यक्रम सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये झाला. कार्यक्रमात एलएडी, तिरपुडे व शासकीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमत मीडिया समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांच्या हस्ते सारा टोड यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी लोकमत मीडिया समूहाचे उप-सरव्यवस्थापक आशिष जैन, अध्यक्ष (विक्री) करुण गेरा आदी उपस्थित होते. टोड यांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत रंगतदार झाला. त्यात विद्यार्थ्यांच्या भन्नाट प्रतिसादाची भर पडली. टोड यांच्या प्रत्येक पाककृतीला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. टोड यांनी प्रत्येक पदार्थांत संत्र्याचा वापर केला. त्यांनी तयार केलेला प्रत्येक पदार्थ नवीन होता. ते पदार्थ त्यांनी स्वत:च्या कौशल्याचा उपयोग करून तयार केले. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांची चव उपस्थितांना चाखायला मिळाली. प्रत्येक पदार्थ स्वादिष्ट व संत्र्याच्या आल्हाददायक चवीची अनुभूती देणारा होता. टोड यांना पदार्थ तयार करण्यासाठी दोन विद्यार्थिनींनी मदत केली.नागपुरातील प्रसिद्ध पदार्थांची विचारणाकार्यक्रमादरम्यान, टोड यांनी नागपुरातील प्रसिद्ध पदार्थांची माहिती विचारली. उपस्थितांनी त्यांना सावजी, संत्रा बर्फी व पाटवडीची माहिती देऊन हे पदार्थ एकदातरी चाखण्याचा आग्रह केला. त्यानंतर टोड यांनी हे पदार्थ खाऊनच परत जाईल असे सांगितले.बजाज उपकरणांची प्रशंसाटोड यांनी पदार्थ तयार करण्यासाठी बजाज उपकरणांचा उपयोग केला. त्यानंतर त्यांनी या उपकरणांची प्रशंसा केली. ही उपकरणे वापरण्यास सोपी आहेत. खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी अशी चांगली उपकरणे असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.पाककला आवडता विषयटोड यांनी पाककला हा त्यांचा आवडता विषय असल्याची माहिती दिली. खाद्य पदार्थ तयार करण्याची लहानपणापासूनच आवड आहे. त्यासाठी नेहमीच तत्पर असते. विद्यार्थीदशेत पाककला शिकण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर