शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जागतिक निसर्ग संवर्धन दिन; १६० च्यावर वनस्पती प्रजाती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 10:23 IST

उपयोगासाठी अतिदोहन झाल्याने वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६० ते १६६ प्रजातींच्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देऔषधी व खाद्य वनस्पतींचाही समावेश विदर्भात १५०० च्यावर प्रजाती

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनस्पतीशिवाय मानवासह सर्वच सजीव प्राण्यांचे जगणे अशक्य आहे. प्रत्येक सजीव प्राण्याची अन्नाची गरज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झाडांवरच अवलंबून आहे. आता कुठे वृक्ष संवर्धनाबाबत बऱ्यापैकी जनजागृती होत आहे मात्र पूर्वीच्या दुर्लक्षामुळे किंवा उपयोगासाठी अतिदोहन झाल्याने वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६० ते १६६ प्रजातींच्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.‘फ्लोरा ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट’ या पुस्तकाच्या माध्यमातून नागपूर जिल्हा तसेच विदर्भ व महाराष्ट्रातील वनस्पतींचा अभ्यास करणारे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे यांनी प्रत्येक प्रजातीच्या वृक्षसंवर्धनाची गरज व्यक्त करताना ही माहिती दिली. वनस्पती म्हटले की लोक उंच झाडे, वेली, फुलांची झाडे आदींचाच विचार करतात. मात्र या सृष्टीत केवळ त्याच नाही तर शेवाळ, मशरूम, कंदमुळे, रान वनस्पती अशा असंख्य वनस्पतींचा समावेश आहे. मात्र मानवी हव्यास आणि दुर्लक्षामुळे पूर्वी दिसणाऱ्या यातील अनेक वनस्पती आता दुर्मिळ झाल्या आहेत. यात विदर्भातील २० ते २५ प्रजातींचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

यामध्ये खाद्य उपयोगी व औषधी वनस्पतींचा समावेश आहे. यातल्या काही प्रजातींचा डॉ. उगेमुगे यांनी आवर्र्जून उल्लेख केला. कंदमुळे प्रजातीतील सफेद मुसळी (गर्भवती स्त्रियांना लाभदायक), पांढरा पळस, पांढरा गुंजा, कृष्ण वड, गुडमार (मधुमेही रुग्णांसाठी लाभकारी), सीता अशोक, पिवळी घाणेरी किंवा गोगल (शिवरात्रीच्या काळात फुलते), कराया गम (डिंक उपयोगी), रक्तरोहन (औषधी), शमी (दसऱ्याच्या वेळी फुलणारी), रक्तचंदन (मधुमेही रुग्णांसाठी उपयोगी), नक्स होमिका (कुचला) काटवेल (खाद्यउपयोगी) अशा काही प्रमुख वनस्पती त्यांनी नमूद केल्या.डॉ. उगेमुगे यांनी १९८६ साली त्यांचा ‘फ्लोरा ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट’ हा जिल्ह्यातील वनस्पतींवरील शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यावेळी जिल्ह्यात १,१३६ प्रजातींच्या वनस्पती असल्याचे नमूद केले आहे. यात गेल्या काही वर्षात १४० ते १५० प्रजातींची भर पडली आहे. विदर्भात १५०० च्यावर प्रजातींच्या वनस्पती उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

३०० च्यावर औषधी वनस्पतीप्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही गुणधर्म असतात. काही खाद्य उपयोगी तर बहुतेक हवा व पाणी शुद्धीकरणासाठी उपयोगी असतात. यात विशिष्टपणे औषधी वनस्पती म्हणून उपयोगी येणाऱ्या ३०० च्यावर प्रजाती विदर्भात असल्याची शक्यता डॉ. उगेमुगे यांनी व्यक्त केली. यामध्ये निरगुडी, कंबरमोडी, गुळवेल, खडूचक्का, भुईनीम, खोबरवेल, गुंज, कनेरा, घाणेरी, माका, गवतीचहा, निवडुंग, काटेसावर अशा वनस्पतींचा समावेश आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग