शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

जागतिक मराठी साहित्य संमेलनाचा मान नागपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:09 IST

जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ११ वे जागतिक मराठी साहित्य संमेलन - ‘शोध मराठी मनाचा’चे आयोजन यंदा नागपूरला करण्याचे निश्चित झाले आहे. येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ मध्ये हे संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे ११ ते १३ जानेवारीदरम्यान साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार असल्याने विदर्भाच्या वाट्याला साहित्यिक मेजवानी आल्याचा आनंद आहे.

ठळक मुद्दे४, ५ व ६ जानेवारीला आयोजन : अकादमीचे ११ वे संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ११ वे जागतिक मराठी साहित्य संमेलन - ‘शोध मराठी मनाचा’चे आयोजन यंदा नागपूरला करण्याचे निश्चित झाले आहे. येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ मध्ये हे संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे ११ ते १३ जानेवारीदरम्यान साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार असल्याने विदर्भाच्या वाट्याला साहित्यिक मेजवानी आल्याचा आनंद आहे.१९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाल्यानंतर २००४ साली पहिले जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरातच घेतले होते. या संमेलनाचे अध्यक्ष राम शेवाळकर हे होते. तब्बल १४ वर्षानंतर हा मान पुन्हा नागपूरला मिळाला आहे. शशिकांत चौधरी हे संमेलनाचे समन्वयक असून संयोजक गिरीश गांधी आहेत. स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, उद्योजक सत्यनारायण नुवाल, माजी खासदार अजय संचेती व पी. डी. पाटील हे या मार्गदर्शक राहणार आहेत.देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर शहर वेगाने विकसित होत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रातही शहर झपाट्याने पुढे येत असून, खासदार सांस्कृतिक महोत्सव, डॉ. वसंतराव देशपांडे संगीत समारोह, कालिदास संगीत महोत्सव अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होत आहे. यात जागतिक दर्जाच्या कलावंतांनीही हजेरी लावली आहे. मेट्रो सिटी व स्मार्ट सिटी म्हणून उद््यास येणाऱ्या संत्रानगरीत जागतिक संमेलनाच्या निमित्ताने साहित्य व सांस्कृतिक महत्त्व मिळत आहे. जागतिक मराठी अकादमीद्वारे आतापर्यंत १० साहित्य संमेलने घेण्यात आलेली आहेत. दुसरे संमेलन अहमदनगर व यानंतर मुंबई, पुणे, पणजी, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, विरार (ठाणे) व नाशिक येथे ही संमेलने झाली. अकादमीची संमेलने भारतातच भरवली जातात. पण, त्यात सहभागी होणारे प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे परदेशातूनही येतात. त्यामुळेच याला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर