शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

जागतिक हास्य दिन : हास्य हे प्रभावी औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:08 IST

हास्य हे प्रभावी औषध आहे. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. आत्मविश्वास वाढतो. शरीरातील ऊर्जेच्या स्तरावरही प्रभाव पाडतो. ऊर्जेमुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे कामात गुणवत्ता वाढवता येते. आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही. हसतमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते.

ठळक मुद्देशारीरिक व मानसिक आरोग्यावर पडतो चांगला प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हास्य हे प्रभावी औषध आहे. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. आत्मविश्वास वाढतो. शरीरातील ऊर्जेच्या स्तरावरही प्रभाव पाडतो. ऊर्जेमुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे कामात गुणवत्ता वाढवता येते. आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही. हसतमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते.स्पर्धेच्या युगात माणूस हसणे विसरत चालला आहे. इंटरनेटच्या आभासीमय दुनियेमुळे आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला आहे. ताणतणावात जगणे वाढले आहे. जीवनशैली बदल्याने नकारात्मक विचार, भावना वाढल्या आहेत. नैराश्याच्या गर्तेत अडकणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. हे टाळण्यासाठी साधा सरळ उपाय म्हणजे खळखळून हसणे. हसत राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात, वागणे सकारात्मक राहते. हसणारे नेहमी उत्साही राहतात. यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हसण्याचे बरेच फायदे आहेत. हसल्यामुळे आयुष्य वाढते. आरोग्याच्या दृष्टीने हसणे किती उपयोगी आहे हे वैद्ययकीय शास्त्रानेदेखील मान्य केले आहे. म्हणूनच डॉक्टरही हसत राहण्याचा, आनंदी राहण्याचा सल्ला देतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी, आनंद हाच त्यामागील भाव असतो.कृत्रिम हसत राहिले तरी चालेल, पण हसामानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी म्हणाले, धकाधकीच्या जीवनात मित्र व परिवारांमध्येही खदखदून हसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, नकारात्मकतेमध्ये वाढ होऊन ताणतणावात जगणे वाढले आहे. त्याचा परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहे. हे टाळण्यासाठी साधा सरळ उपाय म्हणजे म्हणजे हसत राहा. कृत्रिम हसत राहिले तरी चालेल, परंतु हसत राहणे आवश्यक आहे.डॉ. जोशी म्हणाले, मानसोपचारामध्ये ‘अँगल ऑफ माऊथ’ म्हणजे ओठाचे दोन टोक जर खाली असेल तर नकारात्मक विचार करणारा, अशांत असलेला मानला जातो. परंतु जर ओठांचे हेच दोन टोक वर असेल तर मनात शांतता, आनंद, प्रसन्न व सकारात्मक विचारा करणारा असल्याचे मानले जाते. यामुळे मेंदूमधील ‘हॅपीनेस सेंटर अ‍ॅक्टिव्ह’ होते. याचे फायदे मनावर व शरीरावर होतात.हसण्याचे फायदे

  • खळखळून हसल्याने आयुष्यातील दु:खाचे विस्मरण होते.
  •  हसल्याने जीवन निरोगी राहते, आत्मविश्वास वाढतो.
  •  शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो, कामात गुणवत्ता वाढवता येते.
  • आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही.
  • हृदयाचे आरोग्य हेल्दी राहते.
  • हसत राहिल्याने चांगले विचार येतात, वागणे सकारात्मक राहते.
  • हसल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. चेहरा टवटवीत दिसतो.
  • आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकारक्षमता सक्षम होते.

 

टॅग्स :World Laughter Dayजागतिक हास्य दिनnagpurनागपूर