शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जगाचे कल्याण बौद्ध धम्मातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:12 IST

बौद्ध धम्म हा मानवधर्म आहे. जगातील मानवाच्या कल्याणाचा खरा उपाय म्हणजे बौद्ध धम्म होय. जगात जोपर्यंत शांती राहणार नाही तोपर्यंत जगाचा उद्धार होणार नाही.

ठळक मुद्देजपानचे भदंत कानसेन मोचिदा यांचे प्रतिपादन : ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्ध धम्म हा मानवधर्म आहे. जगातील मानवाच्या कल्याणाचा खरा उपाय म्हणजे बौद्ध धम्म होय. जगात जोपर्यंत शांती राहणार नाही तोपर्यंत जगाचा उद्धार होणार नाही. बौद्ध धम्म हा हितकारक व कल्याणकारी आहे. त्यामुळे जगाचे कल्याण हे बौद्ध धम्मानेच होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय निचिरेन शू फेलोशिप असोसिएशन जपानचे प्रमुख भदंत कानसेन मोचिदा यांनी येथे केले.कामठी येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी आयोजित विशेष धम्मदेसना करताना ते बोलत होते. यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष व ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.भदंत कानसेन मोचिदा म्हणाले, बुद्धाचे तत्त्वज्ञान हे चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेद नाकारते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचे तत्त्वज्ञान आवडले. बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही खाण डॉ. आंबेडकरांनी जातीव्यवस्थेनेने ग्रासलेल्या लोकांसाठी शोधून काढली. तसेच यातील जवाहिरांचा मुक्त वापर करण्याचा मंत्र येथील नागरिकांना दिला. बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची स्थिती शून्यवत असली तरी भारतात बौद्ध धम्माचा वृक्ष अद्यापही जिवंत आहे. फक्त त्याचा पाला सुकलेला आहे. या वृक्षाला खतपाणी घातले तर हा वृक्ष पुन्हा फोफावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी सांगितले की, ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधून बुद्धाचे विचार हे जगभरात पोहोचवले जात आहे. या बुद्ध विहाराला आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी भेटी दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदनाप्रारंभी जपान येथील भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी भदंत जिजो हाताकेयामा, भदंत केन्शो नकानो, भदंत होशो सायतो, भदंत गिशो वातानाबे, भदंत ज्युसेन ताचिओका, भदंत मायोत्सू योशीमुरा, भदंत बुनजेन ईझावा, भदंत सेईजेन कोमोनोस भदंत केन्जो सायतो आदी प्रामुख्याने उपस्थित होते.