शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

जागतिक पृथ्वी दिन डिजिटल पद्धतीने साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:45 IST

‘अर्थ डे नेटवर्क’ या एनजीओच्यावतीने जगभरात दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक विश्व पृथ्वी दिवस साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे हा दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘अर्थ डे नेटवर्क’ या एनजीओच्यावतीने जगभरात दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक विश्व पृथ्वी दिवस साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे हा दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरातसुद्धा महानगरपालिका आणि पर्यावरण संस्था ग्रीन विजिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पद्धतीने हा दिवस साजरा केला जाणार आहे.ग्रीन विजिल फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पृथ्वी दिवस पाळण्याचे यंदाचे हे ५० वे वर्ष आहे. ‘क्लायमेट अ‍ॅक्शन’ अशी यंदाच्या वर्षातील मध्यवर्ती संकल्पना आहे. या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे होणारे जलवायू परिवर्तन थांबविणे, कार्बन उत्सर्जन घटविणे, अन्न वाया घालविण्यापासून थांबविणे, सफाई अभियान आदींवर भर देणे हा या मागील हेतू आहे. या निमित्त यंदा प्रसिद्ध गायकांनी गायलेले ‘धरती मां’ हे गीत हिंदी भाषेसह विविध भाषांमध्ये रिलिज झाले आहे.मध्य भारतासाठी अर्थ डे नेटवर्कच्या समन्वयक म्हणून काम करणाऱ्या नागपुरातील सुरभी जायसवाल म्हणाल्या, अर्थ डे नेटवर्क नागपूर महानगर पालिकेसोबत नागपूर शहरासह लगतच्या परिसरात पर्यावरण संरक्षणासाठी अभियान चालवित आहे. यात पौर्णिमा दिवस अभियान, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन, स्वच्छ भारत अभियान, जल संरक्षण, कचरा वर्गीकरण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.

टॅग्स :Earthपृथ्वीdigitalडिजिटल