शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘एम्स’मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी जागतिक दर्जाची सुविधा

By सुमेध वाघमार | Updated: July 11, 2024 17:37 IST

डॉ. जोशी : बाधितांसाठी ओपीडीमध्ये स्वतंत्र खिडकी

सुमेध वाघमारेनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) सिकलसेल अ‍ॅनिमिया असलेल्या रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिकलसेलबाधितांसाठी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) स्वतंत्र विशेष नोंदणी काऊंटर उघडण्यात आले आहे. सोबतच उपचार, औषधांची विशेष सोय सुद्धा सुरू करण्यात आल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. पी.पी. जोशी यांनी दिली.      

सिकलसेलच्या रुग्णांसाठी ओपीडीमध्ये विशेष सोयी-सुविधां कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. जोशी म्हणाले, या रुग्णांसाठी वॉर्डात काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ‘सेंटर आॅफ एक्सलन्स फॉर सिकलसेल अ‍ॅनिमिया’च्या विकासासाठी प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. पॅथॉलॉजीच्या विभाग प्रमुख डॉ. रसिका गडकरी यांनी सांगितले की, सिकलसेलच्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या ‘एम्स’मध्ये उपलब्ध आहेत. सकलसेल रुग्णांमध्ये ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ला मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले ‘हेमॅटोपोएटिक स्टेम सेल’ संकलन आणि ‘क्रायोप्रिझर्वेशन’ देखील उपलब्ध आहे. हेमॅटोलॉजिस्ट डॉ विश्वदीप खुशू यांनी सांगितले, ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट युनीट’ कार्यान्वित झाल्याने सिकलसेलच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

गर्भातच सिकलसेलचे निदानसिकलसेल अ‍ॅनिमियाचे गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत आणि १६ ते २० आठवड्यांत ‘अ‍ॅम्नीओसेन्टेसिस’ आणि ‘कोरिओनिक विलस बायोप्सी’ द्वारे सिकलसेल अ‍ॅनिमियाचे प्रसूतीपूर्व निदान मोफत करण्याची सोय ‘एम्स’मध्ये उपलब्ध आहे. मोफत समुपदेशन सेवाही सुरू करण्यात आली आहे.  विवाहपूर्व समुपदेशनासाठी, जनजागृती आणि स्क्रीनिंगसाठी नियमित कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ मीनाक्षी गिरीश, डॉ अमोल दुबे, डॉ ऋचा जुनेजा, डॉ नितीन मराठे, डॉ मेधा डविले, डॉ मीना मिश्र, डॉ अमोल डोंगरे, डॉ आकाश बंग आदी उपस्थित होते.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयnagpurनागपूर