शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘ड्रॅगन पॅलेस’ येथे बुधवारपासून जागतिक बौद्ध धम्म शांती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:30 IST

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग असेल.

ठळक मुद्देजगभरातील बौद्ध भिक्खू येणार : उद्घाटक भदंत संघसेना, अध्यक्ष भदंत वरसंबोधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग असेल.१७ आॅक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर, लेह-लद्दाख, जम्मु-काश्मीरचे संस्थापक अध्यक्ष भदंत संघसेना यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया, बौद्धगयाचे उपाध्यक्ष भदंत डॉ. वरसंबोधी राहतील. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे विशेष अतिथी राहतील. यानंतर ‘जागतिक शांती, मैत्री व मानव कल्याणाकरिता बौद्ध धम्माची आवश्यकता’ या विषयावर परिसंवाद होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात भिक्खुनी मायाआॅन कातायामा (जपान) भदंत मेधंकर (श्रीलंका), भदंत सयाडो शिरींघ (म्यानमार), भदंत थीच नाट टू (व्हिएतनाम), भदंत ,सोबिता (नेदरॅण्ड), भदंत पालडेल नामग्याल (तिबेट) आणि भदंत प्रमहा अनेक उदोम धम्मकित्ती (थायलँड) हे प्रमुख वक्ते राहतील.

 

टॅग्स :Dhammbhumiधम्मभूमीnagpurनागपूर