शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कार्यादेश न देताच कामांचा धडाका : 'आपल्या' मर्जीतील कंत्राटदाराला नफा होण्यासाठी नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:09 IST

हिवाळी अधिवेशन : हैदराबाद हाउसच्या १२ क्रमांकाच्या बॅरेकला नवा लूक

कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नव्या सरकारच्या स्वागतासाठी सर्वकाही चकाचक केले जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील अनेक कामे कार्यादेश न देता केली जात असल्याची माहिती आहे. 'आपल्या' मर्जीतील कंत्राटदारांना अधिक नफा व्हावा, यासाठी नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप होत आहे.

हिवाळी अधिवेशनात कार्यादेशाशिवाय सुरू असलेल्या कामांमध्ये हैदराबाद हाउसच्या (मुख्यमंत्री सचिवालय) बेरेक क्रमांक १२ चाही समावेश आहे. या बॅरेकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या केबिन आहेत. २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात येथील छताचा काही भाग कोसळला होता. अशा स्थितीत तातडीने दुरुस्तीची गरज होती. मात्र बाधकाम विभागाने वर्षभरात याकडे लक्षच दिले नाही अचानक विभागाला आपल्याच सचिवांचे कार्यालय नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. बॅरेकची दुरवस्था पाहून ती पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कोणतीही प्रक्रिया न करता हे काम आदित्य कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. 

नियमानुसार कोणत्याही कामासाठी आधी एस्टीमेट तयार करून नंतर निविदा काढली जाते. त्यानंतर सर्वांत कमी बोली लावणाऱ्याला कार्यादेश दिला जातो. त्यानंतरच कंत्राटदार कामाला सुरुवात करतो. परंतु ही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. थेट काम देण्यात आले. ज्या कंत्राटदाराला हे काम मिळाले आहे. तो येथील शाखा अभियंत्यांच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. उपअभियंता संजय उपाध्याय यांच्या सूचनेनुसार कोणतेही कार्यादेश न देता हे काम देण्यात आले. यासाठी वरिष्ठांची परवानगीही घेण्यात आलेली नाही. बांधकाम विभागात सध्या कारनाम्याची जोरदार चर्चा आहे. अधिकाऱ्याचा 'आशीर्वाद' असेल काम मिळतेच असा दावा केला जात आहे. आता स्वतःला वाचविण्यासाठी अधिकारी हे काम सोसायटीकडे सोपवू शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे. 

कार्यादेश देण्याची तयारी या संदर्भात 'लोकमत'च्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडे नव्हती. दिवसभरात कार्यादेश दिले नसल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत आचारसंहिता असल्याने आधी कामाला प्राधान्य दिले. मात्र, लवकरच कार्यादेश काढले जाईल, असा दावा सायंकाळी अधिकारी करू लागले होते. काम वेळेत पूर्ण होण्यासाठी अनेक वेळा अशा तडजोडी कराव्या लागतात असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर