शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश’ म्हणजे राष्ट्रनिर्माणाचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:42 IST

दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या  अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रदीप आगलावे : अभिनंदन व प्रशस्तीपत्र वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला एकसंध करायचे असेल तर जाती जोडण्यापेक्षा माणसं जोडणं महत्त्वाचं आहे. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यांना समतेचे विचार समजतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच समतेचे विचार दिले आहेत. संविधानाच्या पानापानावर हे विचार अधोरेखित झालेले आहेत. दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश-मैत्री व करुणेचा’ हे अभियान नेमके हेच विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचे कार्य करतात. तेव्हाच ‘मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय’ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजते. त्यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या  अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग, धम्मसंदेश अभियान संघ आणि बानाई यांच्या सहकार्याने विविध महविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे दीक्षाभूमीवर ‘धम्मसंदेश मैत्री व करुणेचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पथनाट्यांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी केले. या अभिनव उपक्रमात सहभागी ३०० विद्यार्थी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या समरंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. आगलावे बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) नीलेश भरणे, डॉ. रमेश शंभरकर, प्रशांत तांबे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी नीलेश भरणे यांनी धम्मसंदेश या अभियानाचे कौतुक केले. समाजासाठी काही करायचे आहे असे अनेक जण बोलतात, पण कृती करताना मात्र फार कमी जण असतात. धम्मसंदेश अशीच कृती करणाऱ्यांचे अभियान आहे.संचालन अरुणा गजभिये यांनी केले. अंकित राऊत यांनी आभार मानले.संविधान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यडॉ. सिद्धार्थ गायकवाड यावेळी म्हणाले, धम्मसंदेश हा समाजनिर्मिती व राष्ट्रनिर्माणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासाचेही कार्य करतो. खरे संविधान काय आहे? हे लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत खरी लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. धम्मसंदेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान पोहोचविण्याचे कार्य केले जाते.

टॅग्स :nagpurनागपूर