शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय मजूर गावी गेल्याने घरकुलांचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:51 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्याने या कामावरील ६०० परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले. यामुळे या प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका एप्रिलमध्ये वाटपाचे नियोजन पुढे गेले

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. यातील वाठोडा येथील २६४ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्यात याचे लाभार्थींना वाटप होणार होते. फिनिशिंग व किरकोळ कामे शिल्लक होती. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्याने या कामावरील ६०० परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले. यामुळे या प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.मार्च महिन्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन काही दिवसात संपेल अशी अपेक्षा असल्याने कंत्राटदाराने छत्तीसगड, उत्तरप्रदेश व बिहार येथील मजुरांची व्यवस्था केली होती. मात्र सर्वत्र संसर्गाची भीती परतल्याने मजूर आपल्या गावी निघून गेले. लॉकडाऊनमुळे राज्यांच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे गेलेले मजूर लगेच परतण्याची शक्यता नाही. मजुरांना परत आणता यावे यासाठी एनएमआरडीएने कंत्राटदाराला पत्र दिले. मजुरांना परत आणून तातडीने काम सुरू व्हावे, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनएमआरडीएचे कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी दिली. विविध प्रकल्पांसाठी गुजरात व अन्य राज्यांसोबतच मलेशियातून साहित्य आणावयाचे आहे. मात्र लॉकडाऊनमुळे साहित्य आणण्यात अडचणी येत आहेत.घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. यातील वाठोडा प्रकल्पातील २६५ घरांचे काम पूर्ण झाले आहे. नळाची लाईन, वीज पुरवठा, गडर लाईन, रस्ते अशा आवश्यक सुविधांची कामे झालेली आहेत. या घरांचे एप्रिल महिन्यात वाटप केले जाणार होते. तरोडी (खुर्द) येथे २३०० आणि ९६०, मौजा वांजरी येथे ७५० घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र मजूर नसल्याने व काही अडचणीमुळे काम रखडले आहे.लॉकडाऊन कालावधीत बँक हप्त्यांना सवलतघरकुलासाठी अर्थसाहाय्य घेतेलेल्या लाभार्थींना लॉकडाऊन कालावधीत बँक कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत दिली जाणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर हप्ते भरता येतील. त्यामुळे लाभार्थींना दिलासा मिळणार आहे. वाटपाला विलंब झाला तरी घराच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.अन्य विकास कामांनाही फटकालॉकडाऊनमुळे घरकूल प्रकल्पासोबतच कोराडी तीर्थक्षेत्र विकास (२२१ कोटी), ताजबाग दर्गा विकास (१३२ कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर (११४ कोटी), दीक्षाभूमी विकास (१०९ कोटी), फुटाळा तलाव संगीत कारंजे (१०० कोटी) आदी प्रकल्पांच्या कामावरील परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत. यामुळे काम रखडले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस