शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

भाउसाहेबांच्या कार्याकडे विदर्भातील साहित्यिकांनी दुर्लक्ष केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 21:28 IST

देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहिती नाही, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देबबनराव देशमुख : ‘सूर्यावर वादळे उठतात’ नाट्यपुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहिती नाही, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.आकांक्षा प्रकाशन व महात्मे-पालोरकर परिवाराच्यावतीने लेखक प्रा. बाळकृष्ण महात्मे लिखित ‘सूर्यावर वादळे उठतात’ या नाट्यपुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार जगन वंजारी, मनोहर वानखेडे, डॉ. अरुणा सबाने, डॉ. वंदना महात्मे, निर्मला महात्मे आदी मान्यवर उपस्थित होते. भाऊसाहेबांसारख्या महनीय व्यक्तिबाबत वैदर्भीय लेखकांनी दुर्लक्ष केले, हे दुर्दैव आहे़ अशा पार्श्वभूमीवर प्रा़ बा. द़ महात्मे यांच्या नाट्यपुस्तकातील वादळरुपी प्रसंगांतून भाउसाहेबांचा इतिहास प्रकाशात आला. बहुजनांसाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरणारे असून यातून नव्या पिढीला भाउसाहेबांचे मोठेपण कळेल, असे कौतुकस्वर डॉ. तायवाडे यांनी व्यक्त केले.यावेळी जगन वंजारी यांनीही डॉ. पंजाबराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. भाउसाहेबांनी वेदावर डिलीट ही पदवी प्राप्त केली होती. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात कुसुमावती देशपांडे यांना प्राध्यापक म्हणून नियुक्त केल्यानंतर ब्राम्हण महिलेला निवडल्यावरून त्यांना प्रश्न केले जायचे. त्यावेळी वेदांचा अभ्यास केलेले भाउसाहेब प्रश्नकर्त्यांना, या देशातील कोणत्याच समाजातील स्त्रीला कधी अधिकार मिळाले नाहीत, त्यामुळे कोणतीच स्त्री ब्राम्हण नसून सर्व स्त्रिया शुद्रच आहेत,असे ठामपणे उत्तर देत असल्याची आठवण वंजारी यांनी सांगितली.यावेळी मनोहर वानखेडे यांनी प्रा. बा.द. महात्मे यांच्या स्मृतींना उजाळा दिला़ शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरीला असताना त्यांचे अनेकदा वाद झाले़, तरीही भाऊसाहेबांविषयीची त्यांची निष्ठा तिळमात्र कमी झाली नाही. प्रा. महात्मे यांचे विचार या नाट्यपुस्तकाद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचतील, ही भावना वानखेडे यांनी व्यक्त केली. बाबांनी लिहिलेल्या या नाटीकेला रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे १५ वषार्पूर्वी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे त्यांची मुलगी वंदना महात्मे यांनी सांगितले़ प्रा. महात्मे यांनी लिहलेल्या पंजाबराव देशमुखांवरील या नाटकाला सादरीकरणाची क्षमता निर्माण करून रंगमंचावर सादर करण्यात यावे, अशी ईच्छा गिरीश गांधी यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक अरुणा सबाने यांनी केले़ संचालन चारुशिला महात्मे यांनी केले़ गजानन पालोरकर यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर