शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

वुलन वस्त्रांनी सजली नागपुरात बाजारपेठ : जवळपास १० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:12 IST

थंडीचा जोर वाढला असून बाजारात वुलन कपड्यांना मागणी वाढली आहे. बहुतांश शोरुममध्ये ब्रॅण्डेड तर तिबेट येथील लोकांनी सीताबर्डी आणि बैद्यनाथ चौक येथील मैदानावर स्वेटर आणि सर्व प्रकारच्या वुलन वस्त्रांचे स्टॉल लावले आहेत.

ठळक मुद्देब्रॅण्डेड स्वेटर व जॅकेटला जास्त मागणी, तिबेटी स्वेटर मार्केटमध्ये गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थंडीचा जोर वाढला असून बाजारात वुलन कपड्यांना मागणी वाढली आहे. बहुतांश शोरुममध्ये ब्रॅण्डेड तर तिबेट येथील लोकांनी सीताबर्डी आणि बैद्यनाथ चौक येथील मैदानावर स्वेटर आणि सर्व प्रकारच्या वुलन वस्त्रांचे स्टॉल लावले आहेत. त्यातच प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. फॅशनेबल थंडीत तरुणांमध्ये जॅकेट आणि तरुणींमध्ये वुलन कुर्त्यांना जास्त मागणी आहे. सध्या वातावरणामध्ये कमालीचे बदल होत असल्याने थंडीचा कालावधीही कमी होत चालला आहे. थंडीचा हंगाम चार महिने असला तरी स्वेटर विक्री दोनच महिने होते. नागपुरात सर्व प्रकारच्या वुलन वस्त्रांची उलाढाल जवळपास १० कोटींची आहे.पूलओव्हर, जॅकेट्स, खास वुलन स्टाइल दिसणारे टी शर्ट-टॉप्स, स्वेटर्र्स, मफलर्स, टोप्या, किटोजच्या आत घालण्यासाठी थोडे गरम सॉक्स असे एक ना अनेक प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. वुलन म्हणजेच लोकरीसारख्याच दिसणाऱ्या, पण बदलत्या हवामानातही वापरता येतील अशा कम्फर्टेबल कपड्यांनी मार्केट भरून गेले आहे. मुले आणि मुली अशा दोघांनाही वापरता येतील असे काही ‘कॉमन’ प्रकारही उपलब्ध आहेत.विविध शोरुममध्ये ब्रॅण्डेड शालीस्वेटर्सबरोबरच हाताने विणलेल्या मऊ गुलाबी शालीही लक्ष वेधून घेतात. सध्या अशा स्टॉलवर तरुणाईची मोठी गर्दी दिसून येतेय. कडाक्याची थंडी पडते म्हणून नव्हे तर, नव्या स्टाईलच्या शोधात असलेले तरुण, वयस्क त्यावर लक्ष ठेवून आहे. मार्केटमध्ये सध्या विंटरवेअर्सची फॅशन जोरात आहे. थंडी एन्जॉय करू पाहणारे यूथ सध्या खास विंटर फॅशन स्टफ खरेदी करत आहेत. थंडीसाठी आलेल्या खास गोष्टींपैकी मफलर कम स्कार्फना मुलांमध्ये जास्त पसंती, तर गुलाबी, पिवळ्या शालींना मुली जास्त पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. थंडीनुसार हाफ स्वेटरची स्टाईल इन असून, टॉप किंवा टी-शर्ट म्हणूनही मुले ती वापरताना दिसत आहे.महिलांसाठी खास व्हेरायटीजुन्या पद्धतीचे स्वेटर वापरायचे नसेल तर वुलनचे कुर्ते उपलब्ध आहेत. यात स्वेटरसारखाच ऊबदारपणा असतो. हे कुर्ते प्लेन आणि विविध रंगांमध्ये आहेत. यामध्ये प्रामुख्याने एम्ब्रॉयडरी, कम्प्युटर प्रिंट असे डिझाईनचे काही प्रकार आहेत. पोलो नेक, टी-नेकमध्ये फूल स्लिव्हज, लाइटवेटमध्येही उपलब्ध आहेत. या कुर्त्यांच्या बरोबरीनेच ‘वुलन लेगिन्स’ हा नवा प्रकारही बाजारात आहे. विविध रंगांमध्ये असलेले हे लेगिन्स लोकरीचे आहेत. यांची किंमत २०० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत.वयोगटानुसार व्हेरायटीथंडीच्या दिवसांत सकाळी उठून शाळेत जाणे म्हणजे लहान मुलांना शिक्षाच वाटते. त्यावर उपाय म्हणून जाड स्वेटरचा पर्याय स्वीकारला जातो. पण दप्तर आणि स्वेटरचे ओझे मुलांना नकोसे वाटते. त्यामुळे बाजारात खास मुलांसाठी लाईटवेट स्वेटर आली आहेत. वुलनची स्वेटर हलकी असली तरी ऊबदार असतात. विविध रंगांमध्ये आणि आकर्षक डिझाईनमध्ये ते उपलब्ध आहेत.महिलांसाठी कॉलर, गोल व व्ही गळ्याची स्वेटर, चेन, बटन व पॉकेट स्वेटरला जास्त मागणी आहे. युवतींमध्ये स्लिव्हलेस व विनापॉकेट स्वेटरला जास्त पसंती आहे. स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या स्वेटरला जास्त मागणी असल्याने स्वेटर मार्केटमध्ये चांगली उलाढाल होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.टोपी व वुलन सॉक्सथंडीच्या सीझनमध्ये विविध आकारांच्या टोप्यांना मागणी असते. मात्र, पूर्वीपासून चालत आलेल्या माकडटोपीचे स्थान टिकून आहेच, पण नवे लूक देणाºया डोक्याला परफेक्ट बसणाºया गोल टोप्यांचा ट्रेंडही जास्त आहे. मफलर आपली जागा टिकवून आहेत. पूर्वी हे मफलर फक्त पुरुष वापरायचे, पण आजकाल महिलांसाठीही डिझायनर मफलर बाजारात आहेत. थंडीसाठी खास प्युअर वूलनचे सॉक्सही बाजारात उपलब्ध आहेत. यात प्लेनबरोबरच प्रिंटेड सॉक्सचा समावेश आहे. तसेच विविध रंगांचे अँकल्सदेखील पाहायला मिळतात. यात भरपूर व्हेरायटी आहेत.चायना मेड कपड्यांशी स्पर्धाया व्यवसायाला सध्या चायनामेड बनावटीच्या ऊबदार कपड्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. दिसायला आकर्षक आणि कमी किमतीमुळे अशी स्वेटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असली तरी, लोकरीपासून बनविलेल्या स्वेटरनाही तितकीच चांगली मागणी आहे. पुरुषांसाठीची तयार स्वेटर दिल्ली, लुधियाना येथून येतात. त्यांची किंमत साधारणपणे २०० पासून २ हजार रुपयांपर्यंत आहे.थंडीपासून बचाव कराथंडीतील सर्वांत महत्त्वाची काळजी म्हणजे स्वेटर, कानटोपी, मोजे वापरणे. लोकर ही ‘इन्सुलेटर’ म्हणून काम करत असल्याने थंडीपासून बचाव होण्यासाठी लोकरी कपडेच आवश्यक असतात. थंडीत फिरताना मजा येते, पण खोकला होण्याची शक्यता देखील तेवढीच असते. त्यामुळे तोंड, नाक, कान झाकले जाईल अशा पद्धतीने स्कार्फ बांधूनच थंडीत फिरणे योग्य ठरते.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीTextile Industryवस्त्रोद्योगnagpurनागपूर