लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसाधारण सभेत नगरसेवक नागरिकांच्या समस्या मांडतात. त्यावर महापौर निर्देश देतात. परंतु महापालिका प्रशासनाकडून निर्देशांचे पालन होत नाही. सहा महिन्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून न्याय मिळत नाही. अधिकारी एकमेकावर जबाबदारी ढकलतात. नवीन नगरसेवकांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. यावर सत्तापक्ष नेते संदीप जोशी संतप्त झाले. निर्देशांची दखल घेतली जात नसतानाही आम्ही जाब विचारायचा नाही का, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.महापालिका मुख्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी मशीनचा वापर करतात, असा प्रश्न शिक्षण सभापती दिलीप दिवे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सत्तापक्षाचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक हरीश ग्वालबंशी, बसपाचे माजी गटनेते मोहम्मद जमाल यांच्यासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. आरोप-प्रत्यारोपामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. अखेर संदीप जोशी यांनी पुढील सभागृहात आश्वासन समितीचा अहवाल सादर करण्याची ग्वाही दिली.अवैध टॉवरवर कारवाई करासभागृहात राजकुमार शाहू यांनी शहरातील अवैध मोबाईल टॉवरचा मुद्दा उपस्थित केला. परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी अवैध टॉवर संदर्भात प्रशासनाने काय कारवाई केली, असा प्रश्न केला. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी शहरात ८०० अवैध टॉवर असल्याचे निदर्शनास आणले. प्रवीण भिसीकर यांनी मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचे मोजमाप करण्याची मागणी केली. सदस्यांच्या संतप्त भावना विचारात घेता झोन अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ न १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना दिले.
प्रशासनाला जाब विचारणार नाही का? संदीप जोशी यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:04 IST
नवीन नगरसेवकांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. यावर सत्तापक्ष नेते संदीप जोशी संतप्त झाले. निर्देशांची दखल घेतली जात नसतानाही आम्ही जाब विचारायचा नाही का, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
प्रशासनाला जाब विचारणार नाही का? संदीप जोशी यांचा सवाल
ठळक मुद्देसहा महिन्यानंतरही सभागृहात अहवाल अप्राप्त