शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वित्त कंपन्यांकडून महिला बचत गटांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:34 IST

सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिला स्वयंसाहाय्यता गटांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. कंपन्यांकडून होणारा मानसिक छळ व गैरव्यवहाराला कंटाळून गटांतील अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा प्रचार सर्वत्र करण्यात आला आहे. राजकीय संबंधांमुळे सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांतर्फे राज्यात मनमानी कारभार केला जात आहे, असे खळबळजनक आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : विशेष तपास पथक स्थापन करण्याची विनंती

आॅनलाईन लोकमतनागपूर : सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिला स्वयंसाहाय्यता गटांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. कंपन्यांकडून होणारा मानसिक छळ व गैरव्यवहाराला कंटाळून गटांतील अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा प्रचार सर्वत्र करण्यात आला आहे. राजकीय संबंधांमुळे सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांतर्फे राज्यात मनमानी कारभार केला जात आहे, असे खळबळजनक आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.करण शाहू यांनी ही याचिका दाखल केली आहे. भ्रष्ट व्यावसायिक व राजकारण्यांनी मिळून राज्यात सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांत काळा पैसा गुंतविण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर या कंपन्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी असंख्य महिला स्वयंसाहाय्यता गटांना बळजबरीने कर्ज वाटप केले. त्यानंतर कर्ज वसूल करण्यासाठी गटांवर अत्याचार सुरू केला. नियमानुसार, महिला स्वयंसाहाय्यता गटांकडून बळजबरीने कर्ज वसूल करता येत नाही. असे असताना कंपन्यांची मनमानी सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने ही अवैध कृती थांबविण्यासाठी अद्याप काहीच उपाय केले नाहीत. कंपन्यांची कृती मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.महिला स्वयंसाहाय्यता गटांनी कंपन्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदविल्या आहेत, तसेच यासंदर्भात अनेकदा आंदोलने केली आहेत. परिणामी, राज्य शासनाने डिसेंबर-२०१६ मध्ये प्रकरणाच्या तपासाकरिता विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु १२ एप्रिल २०१७ रोजी विशेष तपास पथकाऐवजी चार सदस्यीय प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा जीआर जारी करण्यात आला. या समितीमध्ये तज्ज्ञ सदस्यांचा समावेश नसल्यामुळे सखोल तपास होणे अशक्य आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत राज्याचे मुख्य सचिव, महिला व बाल कल्याण विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक अधिकारी व केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अरविंद वाघमारे कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर