शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  महिला पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:50 IST

शादी डॉट कॉमच्या माध्यमातून संपर्क साधून लग्न करण्याची थाप मारत पोलीस दलात शिपाई असलेल्या तरुणीचे एका आरोपीने ७९ हजार रुपये हडपले.

ठळक मुद्देलग्न करण्याची बतावणी : ७९ हजार रुपये हडपले, सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शादी डॉट कॉमच्या माध्यमातून संपर्क साधून लग्न करण्याची थाप मारत पोलीस दलात शिपाई असलेल्या तरुणीचे एका आरोपीने ७९ हजार रुपये हडपले. कुंदन जगदीश साठवणे (वय ३२) असे आरोपीचे नाव असून तो रविनगर शासकीय वसाहतीत राहतो.फसवणूक झालेली सोनाली चंद्रकांत मौदेकर (वय २८) ही तरुणी न्यू विराज सोसायटी, बेसा रोडला राहते. ती विशेष शाखेत कार्यरत आहे. १ डिसेंबर २०१८ ला तिची आरोपी कुंदन साठवणेसोबत शादी डॉट कॉमच्या माध्यमातून ओळख झाली. १ डिसेंबर २०१८ ला प्रत्यक्ष संपर्क केल्यानंतर कुंदनने सोनालीला आपण एमएसईबीत अभियंता असल्याचे सांगितले. तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून त्याने तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तो तिच्या घरी येऊ लागला. सोनालीच्या सर्व नातेवाईकांसोबत ओळख करून त्यांची माहिती घेतली. स्वत:बद्दल आणि स्वत:च्या नातेवाईकांबाबत मात्र तो मनात येईल, तशी माहिती देत होता. लग्न करण्याचे ठरल्यानंतर त्याने नवीच थापेबाजी सुरू केली. इथे प्रॉब्लेम झाला, तिथे काम अडले, असे सांगून त्याने सोनालीला आधी ५० हजार, नंतर, १०, ५ तसेच वेगवेगळी रक्कम मागून २४ एप्रिलपर्यंत तिच्याकडून ७९ हजार रुपये घेतले. दरम्यान, लग्न करायचे ठरल्यामुळे सोनालीने कुंदनला त्याचे घर दाखवण्यास सांगितले. मात्र, तो नेहमीच टाळत असल्याने तिला संशय आला. त्यामुळे २४ एप्रिलला सोनालीने काटोल मार्गावरील वीज मंडळाच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेथील अधिकाऱ्यांनी वीज मंडळात कुंदन साठवणे नामक अभियंता तर सोडा चपराशीही नाही, असे सांगितले.जीवे मारण्याची धमकीफसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सोनालीने त्याला फोन करून प्रशासकीय इमारतीजवळ बोलवले. तेथे पोहचल्यानंतर कुंदनला तिने तू फसवणूक का केली, अशी विचारणा केली. त्यामुळे कुंदन गोंधळला. आपली पोलखोल झाल्याचे त्याला लक्षात आले. त्यामुळे त्याने सोनालीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळून गेला. सोनालीने गुरुवारी रात्री सदर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक आर. एल. घुगे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी कुंदनचा शोध घेतला जात आहे. त्याने अशाच प्रकारे अनेकींना गंडा घातला असावा, असाही संशय आहे.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाfraudधोकेबाजी