शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात दारुविक्रेत्याच्या घरी जाऊन महिलांनी पकडली दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 11:49 IST

रामटेक तालुक्यातील पवनी येथे अवैध दारू विक्री वाढली असताना त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक महिलांनी कंबर कसली. दरम्यान, महिलांनी पवनी येथील महिला दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून मोहफुलांची दारू व साहित्य पकडले आणि ते देवलापार पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देरामटेक तालुक्यातील पवनी येथील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : रामटेक तालुक्यातील पवनी येथे अवैध दारू विक्री वाढली असताना त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक महिलांनी कंबर कसली. दरम्यान, महिलांनी पवनी येथील महिला दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून मोहफुलांची दारू व साहित्य पकडले आणि ते देवलापार पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई बुधवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.पवनी येथील एक महिला मोहफुलांची दारू विकत असल्याची माहिती पवनी येथील शारदा महिला मंडळाच्या सदस्यांना मिळाली होती. त्यामुळे या मंडळाच्या सदस्य कमला चौधरी, आमना पठाण, शशीकला ताकोत, पार्वती ठाकरे, माया सिरसाम, हिरा उईके यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन तिला विचारपूस केली. तिने उडवाउडवीची उत्तरे देत घरातून काढता पाय घेतला. मात्र, महिलांनी तिच्या घराची झडती घेतली. त्यात महिलांना घराच्या मागच्या भागात ठेवलेल्या रबरी ट्यूब व कॅनमध्ये मोहफुलांची दारू असल्याचे आढळून आले. परिणामी, महिलांनी लगेच देवलापार पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत संपूर्ण दारू व साहित्य जप्त केले. या कारवाईमध्ये तीन हजार रुपये किमतीची ३० लिटर मोहफुलांची दारू आणि साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी दारूविक्रेत्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तिचा शोध घेणे सुरू केले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा