आॅनलाईन लोकमतचंद्रपूर- ब्रह्मपुरी तालुक्यातील बोडधा येथील सौ. श्रीसागरी गजाजन ठाकरे (४०) ही महिला वाघाने केलेल्या हल्ल्यात ठार झाली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता तेंदूपत्ता तोडण्यासाठी ती जंगलात गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला चढविला.ही घटना ब्रह्मपुरी वन विभाग बोडदा हळदा बिटात घडला. या भागात जंगली जनावरांचे मोठ्या प्रमाणात हल्ले होत असून जिवीतहानी होत आहे. वन्यप्राण्यांच्या अशा हल्ल्यांबाबत वनविभाग गंभीर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
By admin | Updated: May 19, 2017 15:40 IST