शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  महिलेला ट्रकने चिरडले  : जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:25 IST

भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले. मंगला नारायण धोटे (४५, कापसे चौक, लकडगंज) असे मृत महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज चौकात सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. त्यामुळे नागरिकांचा रोष उफाळून आला. जमावाने घटनास्थळावरचे बॅरिकेडस् इकडेतिकडे फेकून सिग्नलचीही मोडतोड केली. जाळपोळही केली. यामुळे चौकातील वाहतूक विस्कळीत होऊन प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा रोष : ट्रॅफिक सिग्नल आणि बॅरिकेडस् तोडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले. मंगला नारायण धोटे (४५, कापसे चौक, लकडगंज) असे मृत महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज चौकात सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. त्यामुळे नागरिकांचा रोष उफाळून आला. जमावाने घटनास्थळावरचे बॅरिकेडस् इकडेतिकडे फेकून सिग्नलचीही मोडतोड केली. जाळपोळही केली. यामुळे चौकातील वाहतूक विस्कळीत होऊन प्रचंड तणाव निर्माण झाला होता.मेट्रोच्या कामामुळे या भागातील रस्ते निमुळते झाले आहेत. अनेक दुकानांसमोर वेडीवाकडी पद्धतीने वाहने उभी असतात. प्रचंड वर्दळीचे मार्ग असूनही या भागातील अनेक चौकात, सिग्नलवर वाहतूक पोलीस हजर नसतात. त्यामुळे या भागातील वाहतूक अनियंत्रित झाली आहे. दुसऱ्या चा विचार न करताच वाहनचालक आपली वाहने दामटतात. त्यामुळे या भागातील रस्त्यावर अनेकदा अपघात घडतात. सोमवारी रात्री असेच झाले. मंगला धोटे नामक महिला आपल्या पतीच्या दुचाकीवर बसून दवाखान्यातून घराकडे जात होती. रस्ता पार करीत असताना भरधाव ट्रकचालकाने धोटे दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मंगला खाली पडून ट्रकखाली चिरडल्या गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या वेळी चौकातील सिग्नलवर कोणताही पोलीस कर्मचारी उभा नव्हता. त्यामुळे जमावाच्या भावना तीव्र झाल्या. त्यांनी तेथील बॅरिकेडस् उचलून इकडेतिकडे फेकले. सिग्नलची तोडफोड केली. काही जणांनी विरोध केल्यामुळे जनभावना अधिकच तीव्र झाल्या. त्यामुळे दुकानासमोरच्या वाहनांची जमावाने तोडफोड केली. जाळपोळ करून काही दुकानांवरही हल्ला केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला, तर अनेक वाहनांना आग लावण्याचे प्रयत्न केला.पोलिसांकडून बळाचा वापरया प्रकारामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. प्रचंड तणावही निर्माण झाला. माहिती कळताच लकडगंजचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. बरेच प्रयत्न केल्यानंतर जमाव जुमानत नसल्याचे पाहून त्यांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. जमाव इकडेतिकडे पळाल्यानंतर पोलिसांनी मंगला धोटे यांचा मृतदेह रुग्णालयात हलविला. या अपघातात मंगला यांचे पती नारायण यांनाही दुखापत झाल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर घटनास्थळी प्रचंड तणाव होता.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर